महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

प्रेम प्रकरणातून युवकाची निर्घृण हत्या! पुलाची शिरोली येथील घटनेने कोल्हापूर हादरले

10:27 AM Jun 15, 2024 IST | Abhijeet Khandekar
Advertisement

पुलाची शिरोली/वार्ताहर

प्रेम प्रकरणातून तरूणीच्या नातेवाईकांनी धारधार शस्त्राने सपासप वार करून तरूणाचा निर्घृण खून केला . हि घटना शुक्रवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमार पुणे- बेंगलूर राष्ट्रीय महामार्गाच्या शेजारी पुलाची शिरोलीतील ( सांगली फाटा) बुधले मंगल कार्यालय येथे घडली . खुन झालेला तरूण हा पाडळी ता. हातकणंगले येथील होता. तो सैन्य दलात (आर्मीत) भरती होण्यासाठी प्रयत्न करत होता. त्या आधिच जीवनातूनचं संपला आणि त्याचे आर्मीचे स्वप्न अपुरेच राहून गेले .

Advertisement

घटनास्थळावरून व पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मयत तरूणाचे नाव संकेत संदीप खामकर ( वय वर्ष १९ रा. पाडळी ता. हातकणंगले ) असे असून त्याचे पेठवडगाव येथील एका मुलीशी प्रेमसंबध होते. त्या मुलीच्या नातेवाईकांचा पुलाची शिरोलीतील बुधले मंगल कार्यालयात बारश्याचा कार्यक्रम होता.संकेत हा मुलीला भेटण्यासाठी गावातील एका मित्राला सोबत घेवून बुधले मंगल कार्यालयात आला असल्याचे मुलीच्या नातेवाईकांना समजल्यावर संकेत व नातेवाईक यांच्यात वाद झाला. या वादातून नातेवाईकांनी त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करून त्यास ठार मारले. ही घटना शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली होती.या तरुणावर हल्ला होत होता .त्यावेळी त्यांना रोखण्यासाठी कोणीच पुढे आले नाही. त्याच्या सोबत आलेल्या मित्रास ही मुलीच्या नातेवाईकांनी ठार मारण्याची धमकी दिली व त्याचा मोबाईल ही काढून घेतला. घाबरलेल्या अवस्थेत संकेतच्या मित्राने तेथून पळ काढला. त्याने शिरोली फाटा येथे येवून अनोळखी व्यक्तीच्या मोबाईलवरून गावात फोन करून घडलेल्या घटनेची माहिती दिली .

Advertisement

संकेतचे नातेवाईक घटनास्थळी येईपर्यंत संकेत जागेवरच रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याच्या मदतीस कोणीच आले नव्हते. संकेतला वेळेवर उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले असते तर त्याचा जीव वाचला असता .

संकेतचे आर्मीत जाण्याचे स्वप्न होते. तो लेखी , शारिरीक व मैदानी परिक्षेत पास झाला होता. फक्त वैद्यकीय तसासणी राहिली होती.
संकेत पाच वर्षांचा होता त्यावेळी त्याच्या वडीलांचे निधन झाले आहे. त्यानंतर संकेतची आई ही संकेतला सोडून तीच्या माहेरी निघून गेली आहे. त्यानंतर आजपर्यंत संकेतचा सांभाळ त्याच्या आजी व चुलत्यानी केला होता. संकेतच्या खुनाच्या बातमीने पाडळी गावात खळबळ उडाली आहे. शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यातील आरोपी हा एका प्रकरणात सजा भोगत आहे. तो नुकताच पॅरोलवर बाहेर आला असे समजते. सपोनि पंकज गिरी तपास करीत आहेत. त्याच्या पश्चात वयस्कर आजी आजोबा व लहान बहिण असा परिवार आहे.

Advertisement
Tags :
Brutal murderkolhapur newsPulach young mani ShiroliPulachi Shiroliyoung man
Next Article