महायुतीच्या नेत्यांचा विरोध असेल तर त्यांनी स्थगिती मागवून घ्यावी; हे सरकार ठेकेदारांच्या दबावाखाली- सतेज पाटील
शक्तीपीठ बाबत महायुतीमधील बाकीच्या दोन पक्षांनी भुमिका घेतली असली तरी भाजपने अजूनही भुमिका घेतली नाही. त्यामुळे भाजपच्या विरोधात भुमिका घेण्याइतकी ताकत बाकिच्यांची आहे काय अशी शंका काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केली. तसेच या सरकारवर केंद्रशासनासह ठेकेदारांचा दबाव असल्यानेच ते केंद्रशासनासमोर झुकत असल्याचा गंभिर आरोपही त्यांनी केला. महायुतीच्या नेत्यांचा या रस्त्याला विरोध असेल तर त्यांनी या अधिसुचनेला स्थगिती मागवून घ्यावी असे आवाहन करताना शक्तीपीठ विरोधात निघणारा मोर्चा मोठ्या ताकदीने काढणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.
कोल्हापूरामध्ये आज काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शक्तीपीठ महामार्गावर भाष्य केले.ते म्हणाले, "शक्तीपीठ बाबत महायुतीमधील बाकीच्या दोन पक्षांनी भुमिका घेतली असून भाजपने अजूनही भुमिका घेतली नाही. महायुतीच्या सर्व नेत्यांनी हा महामार्ग होऊ नये यासाठी भुमिका घेतली आहे. पण तरीही सरकारने अधिसुचना काढली. त्यामुळे भाजपच्या विरोधात भुमिका घेण्याइतकी ताकत बाकिच्या पक्षांची आहे काय याविषयी शंका उपस्थित होते." असा टोलाही सतेज पाटील यांनी लगावला.
पुढे बोलताना त्यांनी, "गेल्या चार महीन्यापांसून शक्तीपीठ महामार्गाविरोधात जनआंदोलन उभे राहीले असून सांगलीसह विदर्भापासून नांदेड शेतकऱ्यांचा उद्रेक पहायला मिळत आहे. य़ा शक्तीपीठ महामार्गाला समांतर असा महामार्ग असताना हा महामार्ग कशासाठी ? केवळ ठेकेदारांसाठीच हा महामार्ग असून त्यांचं हीत जोपासण्यासाठीच आणला गेला आहे."
"कारण शेतकऱ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करणारा आणि महापुराला आमंत्रण देणारा रस्ता नको अशी आमची भावना महाराष्ट्रातील सरकार हे केंद्र सरकारसमोर झुकतय. हजारो शेतकऱ्यांची मागणी असताना अधिसुचना मिळतेच कशी..याचा अर्थ हे सरकार दबावाखाली काम करतयं...त्यांच्यावर ठेकेदारांचा दबाव आहे. त्यांना निवडणुकांआधी ठेकेदार भेटले होते काय ?" असा प्रश्न उपस्थित करून येत्या काळामध्ये निघणारा मोर्चा सगळ्यात मोठा असेल असेही त्यांनी म्हटलं आहे.
महायुतीच्या नेत्यांचा या रस्त्याला विरोध असेल तर त्यांनी या अधिसुचनेला स्थगिती मागवून घ्यावी. फक्त मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन यातून निर्णय होणार नाही. महाविकास आघाडी यावर अधिवेशनमाध्ये रान उठवणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.