विवाहास नकारानंतर युवकाला देतात भोपळा
प्रत्येक देशात विवाह एक संस्कार मानला जातो, परंतु विवाहाच्या पद्धती आणि याच्याशी निगडित प्रथा परंपरा अत्यंत वेगळ्या असतात. अनेक ठिकाणी विवाहावेळी पिता युवतीच्या डोक्यावर थुंकून आशीर्वाद देतात, तर काही ठिकाणी विवाहासाठी युवकाला मार खावा लागतो. परंतु युक्रेनमध्ये विवाहावरुन अजब परंपरा आहे. येथे वधूकडील लोक युवकाला भोपळा देतात.
युक्रेनमध्ये भोपळ्याचा विवाहासाठी वापर केला जातो. युक्रेनमध्ये युवकांना भोपळ्याची मोठी भीती वाटते. याचे कारण विवाहाशी निगडित एक अजब प्रथा आहे. युक्रेनमध्ये जेव्हा एखादा युवक कुठल्याहही युवतीच्या घरी विवाहाच्या मागणीसाठी जातो, तेव्हा त्याला आईवडिलांची देखील सहमती मिळवावी लागते. युवकाला स्वत:सोबत परिवाराच्या दोन सदस्यांना न्यावे लागते. परंतु विवाहाचा अंतिम निर्णय युवतीच करते. जर ती विवाहासाठी होकार देत असेल तर युवकाच्या हात रिबन बांधते, अन् नकार देत असेल तर युवकाला भोपळा दिला जातो.
पूर्व युरोपमध्ये दीर्घकाळापासून भोपळ्याचा अर्थ विवाहास नकार असल्याचे मानले जाते. पूर्वी युवक रात्रीच्या वेळी युवतीला मागणी घालण्यासाठी जायचे. युवकाला रिकामी हाताने न पाठविण्याऐवजी त्याला भोपळा देण्याचा प्रकार सुरू झाला होता. तर भाजी म्हणून भोपळा चांगला दिसत नाही, अशास्थितीत युवतीच्या नकारानंतर भोपळा दिला जात असल्याचे काही लोकांचे मानणे आहे. पुरुषांसाठी भोपळा अत्यंत उपयुक्त आहे, याचमुळे तो दिला जात असल्याचेही मानले जाते.