तरूणाला साडेतीन लाखांचा गंडा! शेअर मार्केटच्या माध्यमातून दामदुप्पट करण्याचे अमिष
मिरज प्रतिनिधी
शेअर मार्केटच्या माध्यमातून दामदुप्पट कऊन देण्याचे अमिष दाखवत तालुक्यातील लिंगनूर येथील तऊणाला तीन लाख, 23 हजार ऊपयांचा गंडा घालण्यात आला. याप्रकरणी सुदर्शन सिद्रय्या वसमाने (वय 25, रा. शिपूर रोड, एमएसईबीजवळ, लिंगनूर) यांनी मिरज ग्रामीण पोलिसात तक्रार दिली आहे. त्यानुसार संशयीत प्रविण बंडू चौगुले (रा. कुकटोळी, ता. कवठेमहांकाळ) याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
एका खासगी कंपनीत मार्केटींगचे काम करणारे सुदर्शन वसमाने यांना 2022 साली संशयीत प्रविण चौगुले हा भेटला. त्याने सुदर्शन यांना शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवण्यास सांगून दामदुप्पट कऊन देण्याचे अमिष दाखवले. त्यानंतर सुदर्शन यांचा विश्वास संपादन कऊन वेळावेळी युपीआय पेमेंटद्वारे तसेच रोख स्वऊपात तीन लाख, 23 हजार ऊपये घेतले. मात्र आजतागायत त्याने पैसे दिले नाहीत.
सुदर्शन यांनी वारंवार पैशांची मागणी कऊनही प्रविण चौगुले याने पैसे परत दिले नाहीत. त्यामुळे दामदुप्पटीचे अमिष दाखवून आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सुदर्शन यांनी मिरज ग्रामीण पोलिसात धांव घेऊन तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी संशयीतावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून, त्याचा शोध सुरू आहे.