युवा भारत होऊ लागलाय वृद्ध
सरासरी वय 24 वरून वाढत झाले 29 वर्षे : 1951 नंतर वृद्धीदर सर्वात कमी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारत युवा लोकसंख्येचा देश आहे. पूर्ण जगात भारत चौथ्या क्रमांकाचा सर्वात युवा देश मानला जातो. या यादीत पहिल्या क्रमांकावर आफ्रिकन देश नायजेरिया आहे. दुसरा क्रमांक फिलिपाईन्स तर तिसरा क्रमांक बांगलादेशचा आहे. 140 कोटीची लोकसंख्या असलेल्या देशात युवांच्या वर्कफोर्समुळे भारताचे महत्त्व वाढले आहे. तर याचदरम्यान एका नव्या अहवालाने सर्वांच्या चिंता वाढविल्या आहेत. भारतात युवा लोकसंख्येचे सरासरी वय यापूर्वी 24 होते, जे आता वाढून 29 वर्षे झाले आहे. हे पाहता युवांची संख्या घटत आहे. 2024 मध्ये देशाच्या लोकसंख्येचा वृद्धी दर 1 टक्क्यांवर पोहोचला आहे, जो 1951 नंतरचा सर्वात कमी आहे. 1951 मध्ये हा दर 1.25 टक्के होता. 1972 मध्ये हा सर्वाधिक म्हणजेच 2.2 टक्के होता. 2021 मध्ये वृद्धांच्या संख्येतील वृद्धीदर 1.63 टक्के राहिला होता. वृद्धांची संख्या वाढत असल्याचा अनुमान एसबीआयने स्वत:च्या नव्या संशोधन अहवालात व्यक्त केला आहे.
वृद्धांच्या संख्येत वेगाने वाढ
- 34 कोटीपर्यंत पोहोचणार 2050 पर्यंत 60 वर्षांहून अधिक वय असलेल्या लोकांची संख्या
- वृद्धांची संख्या 2036 पर्यंत भारताच्या लोकसंख्येत 12.5 टक्के असणार
- 2050 पर्यंत हे वृद्धांचे प्रमाण 19.4 टक्क्यांपर्यंत पोहोचणार
- 2025 मध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या 15.8 कोटी होण्याची शक्यता
- दारिद्र्यारेषेखाली आहे 40 टक्के वृद्ध लोकसंख्या
- 18.7 टक्के वृद्ध लोकसंख्येकडे उत्पन्नाचा कुठलाच स्रोत नाही
या आव्हानांवर काम करणे आवश्यक
वृद्धांमध्ये मधुमेह, हृदयविकार आणि मानसिक आरोग्य समस्यांचे प्रमाण अधिक असते. या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सरकार आणि सामाजिक संघटनांसोबत मिळून काम करण्याची गरज असल्याचे सर्वेक्षण अहवालात म्हटले गेले आहे.