तरुण भारत-बेळगाव, मुंबई, कोल्हापूर, म्हापसा, पुणे, सावंतवाडी विजयी
क्रीडा प्रतिनिधी/बेळगाव
लोकमान्य को-ऑप सोसायटी आयोजित लोकमान्य प्रिमीयर लीग आंतर विभागीय क्रिकेट स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी मुंबई आरो संघाने मॅनेजमेंटचा, तरुण भारत-बेळगाव संघाने रत्नागिरी आरोचा, म्हापचा आरोने बेळगाव आरोचा, पुणे आरोने तरुण भारत-गोवाचा, कोल्हापूरने मुंबई आरोचा तर सावंतवाडीने रत्नागिरी आरोचा पराभव करुन प्रत्येकी 2 गुण मिळविले. उमेश सासणे, सुहास रावळ, जयेश लाड, अशुतोष चौधरी, संजय दळवी व वैभव परब यांना ‘सामनावीर’ पुरस्कार देण्यात आला.
एसकेई प्लॅटिनम ज्युब्ली मैदानावरती गुरुवारी खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात मॅनेजमेंट संघाने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 7 गडी बाद 51 धावा केल्या. त्यात बलराम जाधवने नाबाद 15, परशराम गावडेने 12 धावा केल्या. मुंबईतर्फे भावेश ठोंबरे अभी दर्गी यांनी प्रत्येकी 2 तर अक्षय गाणेकरने 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना मुंबई आरोने 5.2 षटकात बिनबाद 55 धावा करुन सामना 10 गड्यांनी जिंकला. त्यात उमेश सासणेने 3 चौकारांसह नाबाद 26 तर अक्षय गाणेकरने नाबाद 17 धावा केल्या.
दुसऱ्या सामन्यात बेळगाव तरुण भारतने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 1 गडी बाद 135 धावांचा डोंगर उभा केला. त्यात सुहास रावळने 3 षटकार आणि 12 चौकारांसह 30 चेंडूत 76, कर्णधार तन्वीरने 1 षटकार 6 चौकारांसह 17 चेंडूत 42 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना रत्नागिरी आरोने 8 षटकात 8 गडी बाद 32 धावाच केल्या. त्यांचा एकही फलंदाज दुहेरी धावसंख्या गाठू शकला नाही. बेळगावतर्फे सुहास रावळने 4 धावांत 3 तर अंबरीश असोलकर, सचिन सरोळकर, मयुर बाळकर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
तिसऱ्या सामन्यात म्हापसा आरोने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 5 गडी बाद 80 धावा केल्या. त्यात जयेश लाडने 3 चौकारांसह 19, मयुर वीरने 2 षटकारासह 17, देवानंद शेटेने 15 तर गोविंद पालेकरने 12 धावा केल्या. बेळगाव आरोतर्फे भाऊ कुराडेने 21 धावांत 3, महेश गावडे व विनोद नार्वेकर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना बेळगाव संघाने 8 षटकात 5 गडी बाद 44 धावा केल्या. त्यात विनोद नार्वेकरने 2 चौकारांसह 17 धावा केल्या. म्हापसातर्फे जयेश लाडने 16 धावांत 2 तर योगी, मयुरवीर व नितेश शिटगांवकर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
चौथ्या सामन्यात तरुण भारत-गोवा संघाने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 7 गडी बाद 72 धावा केल्या. त्यात राजाराम भट्टने 2 चौकारांसह 20, विष्णू चिरमुरीने 2 चौकारांसह 14 धावा केल्या. पुणेतर्फे शौनक कुलकर्णी व गणेश गुंड्याने प्रत्येकी 2 तर आदित्यने 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना पुणे संघाने 7-5 षटकात 2 गडी बाद 73 धावा करुन साना 8 गड्यांनी जिंकला. त्यात अशुतोष चौधरीने 4 षटकार 1 चौकारासह 20 चेंडूत 40 तर आरुश व योगेश यांनी प्रत्येकी 9 धावा केल्या. गोवातर्फे राजाराम भट्ट, परशराम सावंत यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केले.
पाचव्या सामन्यात कोल्हापूर संघाने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 4 गडी बाद 82 धावा केल्या. त्यात कर्णधार संजय दळवीने 3 षटकार, 3 चौकारांसह 19 चेंडूत 36, यश हंजीने 2 चौकारांसह 17 तर श्रवण धुरीने 15 धावा केल्या. मुंबईतर्फे भावेश ठोंबरे व अभी दार्जेने प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना मुंबई संघाने 8 षटकात 7 गडी बाद 70 धावा केल्या. त्यात अक्षय गाणेकरने 2 चौकारांसह 22 धावा केल्या. कोल्हापूरतर्फे दिलीप पाटीलने 14 धावांत 2, स्वप्नील पाटील व केतन जाधव यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
सहाव्या सामन्यात सावंतवाडी संघाने प्रथम फलंदाजी करताना 6 षटकात 4 गडी बाद 88 धावा केल्या. त्यात सागर वैरकरने 3 चौकारांसह 24, श्रीधर परबने 1 षटकार 3 चौकारांसह 23 तर वैभव परब व गौरव हेर्लेकर यांनी प्रत्येकी 13 धावा केल्या. रत्नागिरीतर्फे संतोष लिंगायत व बानेश चव्हाण यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना रत्नागिरी संघाने 6 षटकात 6 गडी बाद 31 धावा केल्या. त्यांचा एकही फलंदाज दुहेरी धावसंख्या गाठू शकला नाही. सावंतवाडीतर्फे वैभव परबने 5 धावांत 2 तर ओमकार सावंत व तुषार अचरेकरने प्रत्येकी 1 गडी बाद केला.