महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

युवा पिढीने दशावतार कला जपायला हवी !

04:51 PM Dec 02, 2023 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

दशावतारातील भीष्माचार्य यशवंत तेंडोलकर यांचे आवाहन

Advertisement

वार्ताहर/ कुडाळ
युवा पिढीने जेष्ठ कलावंताच्या मार्गदर्शनाखाली दशावतार लोककला पुढे नेली पाहिजे. नवनवीन गोष्टी आत्मसात केल्या पाहिजेत. त्यावेळच्या कलाकारांमध्ये जो संघटितपणा होता तो आताच्या कलाकारांमध्ये दिसत नाही. संघटितपणा टिकवून ठेवण्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे, असे आवाहन दशावतारातील भीष्माचार्य यशवंत तेंडोलकर यांनी तेंडोली येथे केले.

Advertisement

महाराष्ट्र राज्य शासनाच्या कला रजनी लोककला पुरस्कारात जिल्ह्याच्या योगदाना बरोबरच दशावतार बांधव व नाट्यप्रेमींचाही सहभाग आहे. सातासमुद्रापार पोहचलेली दशावतार लोककला अजून वृद्धिंगत करण्यासाठी आपले निश्चितच प्रयत्न राहतील, असेही त्यांनी सांगितले. राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत देण्यात येणारा महाराष्ट्र शासनाचा 'राज्य सांस्कृतिक कलारजनी पुरस्कार' सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील तेंडोली- हुडकुंभावाडी येथील दशावतारातील भीष्माचार्य व ज्येष्ठ कलाकार यशवंत (काका)  तेंडोलकर यांना जाहीर करण्यात आला आहे. त्याबद्दल त्यांचा जेष्ठ रंगकर्मी सुहास वरुणकर सेन्सॉर बोर्ड सदस्य तथा सेवानिवृत्त गटविकास अधिकारी विजय चव्हाण जेष्ठ नाट्यकर्मी ,अक्षरसिंधू नाट्य संस्था कणकवलीचे कार्याध्यक्ष प्रा हरिभाऊ भिसे कथक विशारद पदवी प्राप्त नृत्यांगना मृणाल सावंत यांनी श्री तेंडोलकर यांच्या तेंडोली येथील निवासस्थानी भेट देऊन त्यांचा शाल श्रीफळ व पुष्पहार घालून सत्कार केला. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी सरपंच अनघा तेंडोलकर, उपसरपंच संदेश प्रभू, ,कौशल राऊळ,मीनाक्षी वेंगुर्लेकर, साक्षी राऊळ सुवर्णा तेंडोलकर ग्रामसेवक आत्माराम परब आदी उपस्थित होते श्री तेंडोलकर म्हणाले, त्यावेळी दशावतार प्रवास हा अतिशय खडतर होता. पूर्वी कोणतीही दळणवळणाची साधने नसल्याने डोक्यावर बोजा घेऊन कड्याकपारीतून वाटचाल करून ही कला जिवंत ठेवली. आता प्रत्येक मंडळाकडे गाड्या आहेत. आताच्या शंभर कलाकारांमध्ये आपले सत्तर शिष्य आहेत. त्यापैकी लोकराजा कै. सुधीर कलिंगण हा आपलाच शिष्य होता. ट्रीकसिन नाटकाची पहिली सुरुवात आपणच केली. 25 वर्षापूर्वी सर्वप्रथम मी माझ्या गावात सर्वांच्या सहकार्याने संयुक्त दशावतार केला होता. त्याची फलश्रुती आज आपल्याला पाहायला मिळते. ६ महिने संयुक्त दशावतार व सहा महिने पारंपरिक दशावतार चालत आहे. आपण केलेल्या कामाचे फळ परमेश्वराने आपल्याला दिले आहे.

आपल्या नाट्यप्रवासाची सुरुवात आपल्याच गावातील अमरकला दशावतार नाट्यमंडळातून झाली. आपण अनेक दशावतार नाट्यमंडळात कामे केली. काही दशावतार मंडळेही आपण चालविली. जेष्ठ लोककलाकार कै. बाबी कलिंगण यांच्यासमवेतही काम केले आहे. असे त्यांनी सांगितले.चव्हाण म्हणाले, काका तेंडोलकर यांची दशावतारमधील भीष्माचार्य म्हणून ओळख आहे. त्यांना राज्य शासनाचा दशावतार लोककलेतील मिळालेला पुरस्कार हा आम्हा सर्वांसाठी उर्जा निर्माण करणारा आहे. या लोककलेला पुढे नेण्यासाठी व जिल्ह्यातील सर्व नाट्यमंडळे संघटित होण्यासाठी भविष्यात तुमचे मार्गदर्शन महत्वाचे ठरणार आहे. त्याकाळच्या प्रतिकूल परिस्थितीचा त्यांनी सामना करीत या कलेत लौकिक प्राप्त केला. दशावतारातील अनेक विनोदी भूमिका त्यांनी साकारल्या आहेत. गेली अनेक वर्षे ते दशावतार कला जोपासत आहेत. वयाच्या सत्तरीतही ते ही कला त्याच जोशात जोपासत आहेत. ही अभिमानाची बाब आहे. असे त्यांनी सांगितले.

Advertisement
Tags :
# kudal # yashwant tendolkar # tarun bharat news#
Next Article