यक्षित युवा खेळाडूंचे तायक्यांदोत यश
बेळगाव : यक्षित युवा फौऊंडेशनच्या राव युवा अकादमीतील खेळाडूंनी कर्नाटक सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने धारवाड येथील आर. एन. शेट्टी स्टेडियम येथे आयोजित केलेल्या राज्यस्तरीय तायक्वांदो चॅम्पियनशिपमध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. बेळगाव जिह्याचे प्रतिनिधित्व करताना अनुकरणीय कौशल्य आणि खिलाडूवृत्तीचे प्रदर्शन करताना बेन्सन्स इंग्लिश मीडियम स्कूलच्या मोहम्मदशफी चांदशाहने 41 कि. वजनी गटात सुवर्णपदक पटकवले. तर लिटिल स्कॉलर्स अकादमीच्या श्राव्य शानभागने कांस्यपदक जिंकले. या विजयासह मोहम्मदशफीला या महिन्याच्याअखेरीस नागालँडमध्ये होणाऱ्या अखिल भारतीय शालेय क्रीडा स्पर्धेत तायक्वांदो प्रकारात कर्नाटकचे प्रतिनिधित्व करण्याचा मान मिळाला आहे. या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय तायक्वांदो प्रशिक्षक आणि यक्षित युवा फौऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तायक्वांदो मास्टर श्रीपाद राव यांचे मार्गदर्शन लाभत आहे.