स्थुलत्व कमी करण्यासाठी घ्यावे लागणार नाही औषध
शरीर स्वत:च तयार करणार हॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट वेबसीरिजमध्ये स्टेंजर्स थिंग्सचे नाव सामील आहे. या सीरिजने मागील 4 सीझनच्या बळावर प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे. आता याच्या पाचव्या सीझनची प्रतीक्षा केली जात आहे. निर्मात्यांनी याचा टीझर सादर करत प्रदर्शनाची तारीखही जाहीर केली. अंतिम सीझनचा हा टीझर पाहून प्रेक्षकांची उत्सुकता दुणावली आहे. स्ट्रेंजर्स थिंग्स सीझन 5 चा पहिला वॉल्यूम 27 नोव्हेंबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित केला जाईल. दुसरा वॉल्यूम 2-26 डिसेंबर तर द फायनल वॉल्यूम 1 जानेवारी 2026 रोजी स्ट्रीम करण्यात येणार आहे. स्ट्रेंजर्स थिंग्सच्या सीझन 5 मध्ये काही नव्या चेहऱ्यांची एंट्री होईल. यात लिंडा हॅमिल्टन, एलेक्स ब्रीक्स, नेल फिशर आणि जॅक कॉनली यांचे नाव सामील आहे. तर मिल्ली बॉबी ब्राउन, गॅटेन मातरज्जो, केल्ब मॅक्लॉघलिन, नूह श्नॅप, सॅडी सिंक, फिन वोल्फहार्ड या कलाकारांनी आधीच स्वत:ची ओळख निर्माण केली आहे.
ओजेम्पिक पूर्ण जगात वजन घटविणारे औषध म्हणून चर्चेत आहे, याच्या वापरामुळे मधुमेहाला नियंत्रित करणे आणि वजन कमी करण्यास मदत मिळते. अलिकडेच जपानमध्ये वैज्ञानिकांच्या एका टीमने संशोधनात जीन एडिटिंगद्वारे शरीरात ‘नॅचरल ओजेम्पिक’ निर्माण करण्याची पद्धत शोधली आहे. जपानच्या संशोधकांना जीन एडिटिंगद्वारे शरीरात नॅचरल ओजेम्पिक निर्माण केले जाऊ शकते आणि जे प्रभावी असू शकते, यामुळे वजन कमी करण्यास मदत मिळत असल्याचे आढळून आले.
या संशोधनासाठी टीमने जीन एडिटिंगचा वापर करत उंदरांच्या यकृतात एक्सेनाटाइड (मधमेहावरील औषध)चा अंतर्गत पुरवठा केला, जो जीएलपी-1 एगोनिस्ट बायेटाचा अॅक्टिव्ह कंपोनेंट आहे. ओजेम्पिक आणि वेगोवीप्रमाणेच बायेटा देखील एक इंजेक्शन असून त्याचा वापर रक्तशर्करेच्या स्तराला नियंत्रित करत टाइप 2 मधमेह आणि स्थुलत्वावरील उपचारासाठी केला जातो.
क्लीवलँड क्लीनिकच्या अहवालानुसार जीएलपी-1 एगोनिस्ट औषधांचा एक क्लास असून तो मुख्यत्वे टाइप 2 मधुमेहाने पीडित लोकांमध्ये रक्तशर्करेच्या स्तराला नियंत्रित करण्यास मदत करतो. तर संशोधनात वैज्ञानिकांनी उंदरांवर एक खास जीन एडिटिंग तंत्रज्ञानाचा वापर केला. एकदा उपचार केल्यावर हा उंदिर स्वत:हून एक्सेनाटाइड नावाच्या औषधाला स्वत:च्या शरीरात 6 महिन्यांपर्यंत निर्माण करत राहिला.
नॅचरल ओजेम्पिकची निर्मिती कशी?
संशोधनासाठी टीमने जीन एडिटिंगचा वापर करत उंदरांच्या लिव्हरमध्ये एक्सेनाटाइड इंजेक्ट केले, ज्याचा वापर रक्तशर्करेला नियंत्रित करत टाइप 2 मधुमेह आणि स्थुलत्वाच्या उपचारात वापरण्यात येणाऱ्या जीएलपी-1 औषधांमध्ये (ओजेम्पिक, वेगोवी, बायेटा) केला जातो.
2 समुहांना हायकॅलरी डायट
या संशोधनात 2 समुहांना सामील करण्यात आले, एक समूहाचे जीन एडिटिंग करण्यात आले होते, तर दुसऱ्या समुहाचे जीन एडिटिंग करण्यात आले नव्हते. या उंदरांना अधिक फॅटयुक्त खाणे देण्यात आले, जेणेकरून ते स्थूल होतील आणि प्रीडायबिटीज सारख्या स्थितीत पोहोचतील. ज्या उंदरांचे शरीर नैसर्गिक स्वरुपात एक्सेनाटाइड निर्माण करत नव्हते, त्यांनी जीन एडिटिंगयुक्त उंदरांच्या तुलनेत अधिक खाल्ले होते. तर जीन एडिटिंगनंतर ज्या उंदरांच्या शरीरात एक्सेनाटाइड निर्माण होऊ लागले होते, त्यांनी कमी खाल्ले, त्यांचे वजन कमी वाढले आणि त्यांची इन्सुलिनवरील प्रतिक्रिया चांगली राहिली. यामुळे रक्तशर्करा नियंत्रित राहिली. यादरम्यान जीन एडिटिंग आणि एक्सेनाटाइडच्या उत्पादनाचे कुठलेही खास दुष्प्रभाव दिसून आलेले नाहीत. तर ओजेम्पिक यासारख्या औषधांच्या वापरानंतर पोटाचा लकवा, अंधत्व आणि अवयव निकामी होण्याचे दुष्प्रभाव दिसून येणार येतात.
औषधांवरील निर्भरता संपुष्टात येणार
जपानच्या ओसाका विद्यापीठाच्या संशोधकांनी हे अध्ययन जीनोम एडिटिंगचा वापर अनेक जटिल आजारांवर स्थायी उपचार शोधण्यासाटी केला जाऊ शकतो हे दाखविणारे असल्याचे म्हटले आहे.