भडक भाषेने युद्ध नाही करता येत
सीडीएस अनिल चौहान यांचा टोला
नवी दिल्ली :
युद्ध भडक भाषा करुन कधीच जिंकता येत नाहीत, असा टोला भारताचे सेनाप्रमुख जनरल अनिल चौहात यांनी पाकिस्ताचे ‘फिल्ड मार्शल’ असीम मुनीर यांना लगावला आहे. युद्ध जिंकण्यासाठी प्रक्षोभक भाषेची नव्हे, तर सुनियोजित आणि उद्देशपूर्ण कृतीची आवश्यकता असते, असे प्रतिपादन त्यांनी शनिवारी केले आहे. त्यांनी ही विधाने दुंडिगल येथील वायुदल शिक्षणसंस्थेच्या शीतकालीन संयुक्त पदवीदान समारंभात भाषण करताना केली. शनिवारी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. नुकतेच भारताने पाकिस्तानविरोधात ‘सिंदूर अभियान’ यशस्वी केले आहे. भारताच्या या अभियानात पाकिस्ताच्या लष्करी आस्थापनांची प्रचंड हानी झाली आहे. मात्र, पाकिस्तानचे सेनासर्वेसर्वा असीम मुनीर यांनी या युद्धात पाकिस्तानचा विजय झाल्याचा खोटा दावा करत पाकिस्तानच्याच जनतेची दिशाभूल चालविली आहे. तसेच, भारताने पुन्हा हल्ला केला, तर त्याला धडा शिकवू अशी दर्पोक्तीही ते करीत आहे. या त्यांच्या उद्दाम भाषेला उद्देशून सीडीएस अनिल चौहान यांनी भारताची भूमिका स्पष्ट केली