100 रुपयांमध्ये मिळणार मोठे घर
काही अटींची करावी लागणार पूर्तता
घरखरेदी करणे आता भारतात अत्यंत खर्चिक ठरले आहे. परंतु फ्रान्सच्या अंबर्टमध्ये केवळ 1 युरो म्हणजेच 100 रुपयांमध्ये घर खरेदी करण्याची संधी आहे. परंतु 100 रुपयांच्या घरासोबत काही अटी देखील आहेत. ही घरं अत्यंत जुनी असून ती दुरुस्त करण्यास मोठा खर्च येणार आहे. ही योजना अंबर्ट येथील घटत्या लोकसंख्येच्या समस्येवर मात करण्यासाठी आहे. सध्या अंबर्टमध्ये केवळ 6500 लोक राहत आहेत. हे घर केवळ पहिल्यांदा घर खरेदी करणाऱ्यांसाठी असेल. तर यापूर्वी एक घर खरेदी केलेल्या लोकांना हे घर खरेदी करता येणार नाही. तसेच खरेदीदारांना घराला वास्तव्ययोग्य केल्यावर कमीतकमी 3 वर्षांपर्यंत तेथे रहावे लागणार आहे. जर घरखरेदी करत ते भाड्याने देण्याचा विचार असेल तर ही ऑफर मिळणार नाही. तसेच अटींची पूर्तता न केल्यास शासकीय अनुदान परत मागण्यात येणार आहे. याचबरोबर दंडही भरावा लागू शकतो.
खर्चिक असणार नुतनीकरण
ही घरं अत्यंत खराब स्थितीत आहे हे सत्य आहे, म्हणजेच नुतनीकरणाचे काम मोठे आहे. छत, विजेची तार आणि भिंती नीट कराव्या लागतील. खूप काम करावे लागेल. खरेदीदारांना एक लेखी योजनाही मांडावी लागू शकते. यात कामाचा तपशील आणि कालमर्यादा नमूद करावी लागेल. अंबर्ट हे फ्रान्सच्या दक्षिणपूर्व हिस्स्यात आहे. हे शहर स्वत:ची लोकसंख्या राखण्यासाठी प्रयत्न करत आहे. अनेक युरोपीय शहरं अशाप्रकारच्या योजना राबवत आहेत. स्वस्त घरं देत नव्या लोकांना आकर्षित केले जात आहे. अंबर्ट शहर देखील हेच इच्छित आहे. परंतु खरेदीदारांना कठोर अटींचे पालन करावे लागणार आहे. 1 युरोमध्ये घर मिळविणे सोपे नसेल. नुतनीकरणात लाखो रुपये खर्च करावे लागू शकतात. अंबर्टमध्ये खरेदी करताना काळजी बाळगावी लागणार आहे. ही योजना आकर्षक वाटत असली तरीही यात जोखीम आहे.