For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Solapur : तू प्रेम मागितले मी तुला चाफा दिला... ; सोलापुरात गझल महोत्सवात रसिक मंत्रमुग्ध

05:55 PM Nov 05, 2025 IST | NEETA POTDAR
solapur   तू प्रेम मागितले मी तुला चाफा दिला      सोलापुरात गझल महोत्सवात रसिक मंत्रमुग्ध
Advertisement

           सोलापुरात गझल महोत्सवाचा थाटात शुभारंभ

Advertisement

 सोलापुर : तू आलीस की समुद्र होतो माझा तू गेलीस की वाळू होते. तुझे चालले होते क ख शिकणे तेव्हा माझे बीए चालू होते. अशा विविध गझाला आणि गीते हुतात्मा स्मृती मंदिरच्या रंग मंचावर सादर करण्यात आल्या. महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य विभागाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित तीन दिवशीय गझल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

गजल महोत्सवाचे उद्घाटन सोमवार, ३ नोव्हेंबर रोजी हुतात्मा स्मृती मंदिर मध्ये सोलापूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. इरेश स्वामी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्राध्यापिका नसिमा पठाण, सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने, सांस्कृतिक विभागाच्या अधिक्षक जानव्ही जानकर, समन्वयक अमोल घाबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

Advertisement

मी उगाच मुंबईत काढला बराच काळ पण पुण्यात प्रेम लागले मिळायला. असे बालपण नव्हते माझे कोणीही येवून मुका घ्यावा असे गालपण नव्हते माझे. जीव घेणारी तुझी स्पर्धा जिथे मी येत आहे दुसरा. नको नको ते करून बसलो आहे आयुष्यात उठून बसलो आहे. अशी गझल आणि गीत कवन प्रस्तुत अक्षर अक्षर तुझेच आहे यामध्ये अपूर्व राजपूत, अविनाश काठवटे, सारंग पांपटवार आणि नैनेश तांबे यांनी सादर केले. तर संगीत संयोजन राग आणि प्रकाश योजना
ईशान- गार्गी यांनी केले.

कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात गझल रंग यामध्ये वीनल देशमुख, तुप्ती दामले आणि उमेश साळंखे यांनी कार्यक्रमात बहार आणली. प्रारंभी महाराष्ट्र राज्याचे गीत सादर करण्यात आले त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी बोलताना प्राध्यापिका नसिमा पठाण यांनी गझल दीप आहे श्वास आहे विश्वास आहे असे सांगून सोलापूर मध्येही अनेक गझलकार आहेत आणि त्यांचे गझल सादर केले. त्यानंतर प्रमुख पाहुणे डॉ. हरेश स्वामी यांनी आपल्या मनोगतामधून सांगितले.

अलीकडच्या पिढीला गझलची अधिक माहिती आहे. गझल अधिक कळते अशी पिढी आजची आहे असे सांगितले. सूत्रसंचालन अभीच सानप यांनी केले. समन्वयक अमोल धाबळे यांनी आभार मानले. महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून सचिव डॉ. किरण कुलकर्णी आणि संचालक विभिषण चवरे यांच्या प्रयत्नातून हा गझल महोत्सव सोलापुरात सुरू झाला आहे.

Advertisement
Tags :

.