महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

योगी संयमाने इंद्रियांना अंकित करून घेतात

06:45 AM Sep 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अध्याय तिसरा

Advertisement

बाप्पा म्हणाले, ज्ञानविज्ञान युक्त मनुष्याने केलेली कर्मे त्याला बाधू शकत नाहीत. असा मनुष्य कर्म केवळ एक पवित्र गोष्ट म्हणून करत असतो. म्हणून बाप्पा त्याच्या कर्माला यज्ञाची उपमा देतात. त्याला सर्व ब्रह्मव्याप्त दिसत असतं. यज्ञ हे पवित्र कर्माचे प्रतीक आहे. यज्ञासाठी अग्नी, अग्नीला अर्पण करायची वस्तू, द्रव्य आणि यज्ञ करण्याचे उद्दिष्ट ह्या सर्व गोष्टी लागतात. जो निरपेक्षतेनं यज्ञ करत असतो त्याला वरील सर्व गोष्टी ब्रह्ममय वाटतात. ईश्वरानं दिलेलं कर्म यज्ञासारखं पवित्र कर्म समजून तो काम करण्यास सुरुवात करण्यापूर्वी, करत असताना आणि पूर्ण झाल्यावर ईश्वराचं स्मरण करत आनंद सागरात डुंबत असतो. कोणी योगी शास्त्रांनी सांगितल्यानुसार यज्ञ करावा असे म्हणतात. ब्रह्मज्ञान हाच अग्नी ज्यामध्ये आहे तोही यज्ञच होय असे दुसऱ्या योग्यांचे मत आहे. त्यांच्या मते कर्म कोणतं करायचं हे ज्या ईश्वराने नेमून दिलेलं आहे तोच ते कसं करावं म्हणजे यथायोग्य होईल ह्याचीही प्रेरणा देत असतो. पुढील श्लोकात बाप्पा यज्ञाचे विविध प्रकार सांगत आहेत.

Advertisement

संयमाग्नौ परे भूप इन्द्रियाण्युपजुह्वति ।

खाग्निष्वन्ये तद्विषयांश्छब्दादीनुपजुह्वति।।32।।

अर्थ-हे राजा, काही योगी संयमरूपी अग्नीचे ठिकाणी इंद्रियांचे हवन करतात. दुसरे इंद्रियरूपी अग्नींचे ठिकाणी इंद्रियांच्या शब्दादि विषयांचे हवन करतात.

विवरण- यज्ञ म्हंटला की, अग्नी, हवन आणि हवन करणारा हे तीन घटक आलेच. योगी करत असलेल्या यज्ञामध्ये ते त्यांच्या ज्ञानेंद्रियांचे हवन करून टाकतात म्हणजे प्रत्यक्षात त्यांना विषयांची भुरळ घालण्याची इंद्रियांची शक्ती ते त्यांना हवी तेव्हा वापरतात. इतरवेळी त्यांची इंद्रिये चुपचाप बसलेली असल्याने ती जागच्याजागी असली तरी बिघडत नाही. ही गोष्ट ते संयमाने साध्य करतात. त्यांना ज्या गोष्टीना काबूत ठेवायचे असेल त्यावर संयम करतात. धारणा, ध्यान आणि समाधी ह्या अष्टांग योगाच्या शेवटच्या तीन अंगांचा एकत्रित परिणाम साधून संयम केला जातो. माणसाला त्यांची इंद्रिये त्याच्या मनात येणाऱ्या विचारानुसार, त्याला होणाऱ्या इच्छांनुसार, आजूबाजूच्या भागातील विविध आकर्षणे दाखवून त्यांनी त्यांचा उपभोग घ्यावा म्हणून प्रवृत्त करत असतात.

आजकालच्या जमान्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेचा बराच बोलबाला आहे. त्यानुसार माणसाच्या मनातल्या इच्छा एकदा समजल्या की, त्याला खतपाणी घालणाऱ्या गोष्टी आपोआप पुढे केल्या जातात. यु ट्यूबवर एखाद्याने त्याला आवडणाऱ्या विषयावरील व्हिडीओ बघितला की, त्या विषयाशी संबंधित अनेक व्हिडीओ त्याच्यापुढे ठेवले जातात. माणसाची ज्ञानेंद्रिये फार पूर्वीपासून अशा पद्धतीने कार्य करत आहेत.

योगी मंडळींनी हे बरोबर ओळखलेले असते म्हणून ते इंद्रियांवर संयम करून त्यांना आपल्या ताब्यात ठेवतात. त्यासाठी ते निरिच्छ झालेले असतात. त्यामुळे त्यांच्या मनात विषयांचे विचारच येत नसल्याने त्यांच्या इंद्रियांची सुट्टी झालेली असते. म्हणजेच श्लोकात म्हंटल्याप्रमाणे त्यांनी संयमाच्या अग्नीत इंद्रियांचे हवन करून टाकलेले असते. थोडक्यात न रहेगा बास न बजेगी बासुरी असा सगळा प्रकार असतो.

बाप्पा सांगत असलेल्या यज्ञाच्या दुसऱ्या प्रकारात  मनात येणाऱ्या विचारांनी इंद्रिये कार्यरत होतात हे ओळखून मनात येणाऱ्या विचारांचे ते यज्ञातील अग्नीत हवन करून टाकतात. म्हणजेच योगसाधनेने मनाला निर्विचार करतात. त्यामुळे इंद्रियांची शब्द, स्पर्श, रूप, चव आणि गंध ही माणसाच्या मनाला प्रलोभन दाखवून त्याला फशी पडणारी हत्यारे आपोआपच निष्प्रभ होतात.

क्रमश:

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article