महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

श्रीरामाच्या दरबारात योगी सरकार

06:30 AM Feb 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मंत्रिमंडळ अन् आमदारांसोबत अयोध्येत पाहोचले मुख्यमंत्री

Advertisement

वृत्तसंस्था/ अयोध्या

Advertisement

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आमदार आणि मंत्र्यांसोबत रविवारी रामलल्लाचे दर्शन घेतले आहे. सकाळी 9 वाजता लखनौतून सर्व आमदार आणि मंत्री अयोध्येसाठी रवाना झाले होते. अयोध्येत पोहोचल्यावर या सर्वांचे पुष्पवृष्टीने स्वागत करण्यात आले. यानंतर सर्व नेत्यांनी रामलल्लाचे दर्शन घेतले आहे. विधानसभा अध्यक्ष सतीश महाना आणि उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य हे बसमधूनच अयोध्येत पोहोचले होते. त्यांच्यासोबत अर्थमंत्री सुरेश खन्ना तसेच कुंडाचे आमदार राजा भैय्या देखील होते.

तर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे हेलिकॉप्टरने अयोध्येत पोहोचले, त्यानंतर आमदारांसोबत त्यांनी रामलल्लाचे दर्शन घेतले आहे. परंतु भाविकांची मोठी संख्या पाहता आमदारांना हनुमानगढीचे दर्शन करविण्याचा विचार रद्द करावा लागला आहे. मंत्री आणि आमदारांना अयोध्या दौऱ्याची आठवण म्हणून एक बॅग देण्यात आली असून यात डायरी, कॅलेंडर आणि पेन होते.

विरोधी पक्षांमध्ये तुष्टीकरणाचे राजकारण करणारे नेते आहेत, काँग्रेस आणि समाजवादी पक्ष हे तुष्टीकरणाचे राजकारण करतात. अखिलेश यादव यांना वडिलांकडून वारशादाखल समाजवादी पक्ष मिळाला आणि त्यांनी सनातन धर्माचा विरोध केला असल्याचे उत्तरप्रदेशचे मंत्री नंदगोपाल नंदी यांनी म्हटले आहे.

सर्व आमदारांना अयोध्येत भगवान रामाचा आशीर्वाद घेण्याची संधी मिळाली आहे. भगवान रामाच्या आशीर्वादाद्वारे 2047 पर्यंत भारत विकसित होणार असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांनी केला आहे.

रामलल्लाच्या दरबारात विधानसभा अध्यक्ष सतीश महाना, भाजप आमदारांसोबत रालोदचे 9 आमदार, निषाद पक्षाचे सर्व 11 आमदार, सुभासपचे सर्व 6 आमदार, अपना दल एसचे 6 आमदार अणि काँग्रेस आमदार हजर राहिले. तर समाजवादी पक्षाच्या आमदारांनी या पूर्ण कार्यक्रमापासून अंतर राखले होते.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article