For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बहराइच हिंसा पीडितांची योगींनी घेतली भेट

06:43 AM Oct 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
बहराइच हिंसा पीडितांची योगींनी घेतली भेट
Advertisement

मृताच्या पत्नीने केली कठोर कारवाईची मागणी : मोठ्या बंदोबस्तानंतर क्षेत्रात शांतता

Advertisement

वृत्तसंस्था/ .लखनौ

उत्तरप्रदेशच्या बहराइच येथील हिंसेत मृत्युमुखी पडलेला 22 वर्षीय युवक रामगोपाल मिश्र याच्या परिवाराची मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मंगळवारी लखनौमध्ये भेट घेतली आहे. पीडित परिवार स्थानिक आमदार सुरेश्वर सिंह यांच्यासोबत लखनौ येथे पोहोचला होता. रामगोपालसोबत झालेल्या क्रौर्याचा तपशील मांडून पीडित परिवाराने दोषींवर कठोरातील कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Advertisement

माझा अलिकडेच विवाह झाला होता, आता मी कुठे जाऊ आणि काय करू? ज्याने कुणी माझ्या पतीची हत्या केली आहे, त्याचा एन्काउंटर व्हावा हीच माझी योगींकडे मागणी आहे असे हिंसेत जीव गमावलेल्या रामगोपाल मिश्रच्या पत्नीने प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले आहे. आम्ही मुलाला तर गमाविले आहेत. आता आम्हाला केवळ न्याय हवा आहे. ज्याप्रकारे माझ्या मुलाला मारण्यात आले तसेच त्याच्या मारेकऱ्यांना ठार करण्यात यावे. योगींनी बुलडोझर अॅक्शन करावी असे  रामगोपालच्या आईने म्हटले आहे.

बइराइचच्या महसी येथे मूर्ति विसर्जनादरम्यान दगडफेक, गोळीबारात युवकाच्या मृत्यूनंतर वातावरण अद्याप तणावपूर्ण आहे. परंतु मंगळवारी हिंसक घटना घडलेल्या नाहीत. पूर्ण क्षेत्रात सीआरपीएफ, एसटीएफचे कमांडो आणि पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

30 जणांना अटक

बहराइच हिंसेप्रकरणी आतापर्यंत 30 जणांना अटक करण्यात आली आहे. विविध भागांमधील सीसीटीव्ही फुटेज पडताळून पाहिले जात आहे. हिंसेदरम्यान तयार करण्यात आलेल्या व्हिडिओंच्या माध्यमातूनही समाजकंटकांची ओळख पटविली जात आहे. तर क्षेत्रातील इंटरनेट सेवा अद्याप ठप्प आहे.

विसर्जनादरम्यान दगफडेक

हरदी पोलीस स्थानकाच्या हद्दीत येणाऱ्या महाराजगंज बाजार येथे रविवारी मूर्ती विसर्जनादरम्यान घरांवरून दगडफेक करण्यात आली होती. तसेच समाजकंटकांकडून गोळीबार करण्यात आला होता. या गोळीबारात रेहुआ मन्सूर गावचा रहिवासी 22 वर्षीय रामगोपाल मिश्र याचा मृत्यू झाल्यावर स्थिती नियंत्रणाबाहेर गेली होती. जिल्ह्यात ठिकठिकाणी मूर्ती विसर्जन रोखण्यात आले. शहरात वाहने अन् दुकाने पेटवून देण्यात आली. या हिंसेप्रकरणी सोमवारी रात्री उशिरा हरदी पोलीस स्थानक प्रमुख सुरेश कुमार वर्मा आणि महसी पोलीस स्थानक प्रभारी शिवकुमार सरोज यांना निलंबित करण्यात आले. तर सोमवारी जखमी अन्य दिव्यांग युवक सत्यवान याच्या मृत्यूची अफवा पसरल्याने स्थिती तणावपूर्ण झाली होती.

महराजगंज भागात खासगी रुग्णालय, बाइक शोरुम, दुकान, वाहनांसमवेत अनेक ठिकाणी जाळपोळ झाली आहे. सधुवापूर, नौतला गावात तोडफोड करण्यात आली आहे. कबडियनपुरवा येथे जाळपोळ करण्याचा प्रयत्न झाला आहे. स्थिती पाहता ग्रामस्थांनी जीव वाचविण्यासाठी अन्यत्र धाव घेतली आहे. आतापर्यंत दोन कोटी रुपयांपेक्षा अधिक मूल्याची संपत्ती जळून खाक झाली आहे.

स्थिती नियंत्रणाबाहेर जाणे चिंताजनक

बसप अध्यक्ष मायावती यानी बहराइचमध्ये स्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याप्रकरणी चिंता व्यक्त करत सरकारने तेथे शांतता प्रस्थापित करण्याचे आवाहन केले आहे. अशास्थितीसाठी शासन-प्रशासनाचे धोरण पक्षपाती नव्हे तर पूर्णपणे कायद्याचे पालन करणारे असावे असेही त्यांनी म्हटले आहे.

Advertisement
Tags :

.