कंकणवाडी आयुर्वेदिक कॉलेजमध्ये योगदिन पूर्वतयारीसाठी योगाभ्यास
प्रतिनिधी / बेळगाव
मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्था व आयुष सचिवालयाच्यावतीने 2025 च्या अकराव्या आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी केएलई विद्यापीठाच्या शहापूर येथील बी. एम. कंकणवाडी आयुर्वेद कॉलेजमध्ये पूर्वतयारीचा योगाभ्यास करण्यात आला. सकाळी 7 ते 9 पर्यंत हा कार्यक्रम झाला.
योगदिनाच्या चाळीस दिवस आधी पूवृयारी व सर्वसामान्य नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जागृती निर्माण करण्यासाठी हे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. राणी चन्नम्मा विद्यापीठाचे उपकुलगुरु डॉ. सी. एम. त्यागराज यांनी आपल्या भाषणात योगामुळे होणारे शारीरिक व मानसिक फायदे याविषयी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमात केएलई आयुर्वेद, होमिओपॅथी, आरएलएस कॉलेज, एसबीजी आयुर्वेद कॉलेजचे विद्यार्थी व प्राध्यापक यांनी भाग घेऊन योगाची प्रात्यक्षिके दाखविली. विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी काहेरचे उपकुलगुरु डॉ. नितीन गंगाणे, कुलसचिव डॉ. एम. एस. गणाचारी, आयुर्वेद कॉलेजचे उपप्राचार्य डॉ. पी. जी. जाडर, डीन डॉ. बसवराज तुबाकी, डॉ. अशोक पाटील, डॉ. संजीव टोन्नी, डॉ. संदीप सगरे, डॉ. सुमा, योग प्रशिक्षिका रश्मी चव्हाण आदी उपस्थित होते. डॉ. विष्णुप्रिया यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमात 821 हून अधिक जणांनी भाग घेतला होता.