For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

योगामुळे जीवन सुखी, निरोगी बनते

03:39 PM Jun 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
योगामुळे जीवन सुखी  निरोगी बनते
Advertisement

मंत्री श्रीपाद नाईक : कळंगुळ पद्मनाभ शिष्य सांप्रदायातर्फे योग दिन 

Advertisement

म्हापसा : निरोगी जीवन जगण्यासाठी ऋषीमुनीनी योग दिला आहे.  नियमित योग केल्यामुळे जीवन सुखी व निरोगी बनते,असे प्रतिपादन खासदार श्रीपाद नाईक यांनी केले. कळंगुट पद्मनाभ शिष्य संप्रदायातफ्xढ संत समाजाने आयोजित केलेल्या योग  दिन कार्यक्रमात मंत्री श्रीपाद नाईक प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी सन्माननीय अतिथी म्हणून आमदार मायकल लोबो, हडफ्ढडे सरपंच रोशन रेडकर, उपसरपंच गीता परब, पर्रा सरपंच चंदानंद हरमलकर, जिल्हा पंचायत सदस्य दत्तप्रसाद दाभोलकर, भाजपा उत्तर गोवा उपाध्यक्ष महानंद अस्नोडकर,यशवंत कांदोळकर आदी उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुढाकाराने 21 जून हा दिवस सर्वत्र योगदिन म्हणून साजरा केला जात आहे. आपले जीवन निरोगी ठेवण्यासाठी हा उपक्रम आहे. ऋषीमुनीनी दिलेल्या योग पध्दतीचा प्रत्येकाने अवलंब केला पाहिजे. त्यामुळे आरोग्य निरोगी बनून जीवन समृध्द बनते. कोरोना काळात देखील लोकांनी योग करून जीवन निरोगी बनविले.  आपल्या ऋषीनी योगाबाबत सर्वकाही सांगून ठेवले आहे. त्याचा अभ्यास करून त्या पध्दतीने योगासने करणे आवश्यक आहेत, असे मंत्री नाईक म्हणाले. जे कुणी नेहमीच योग करतात ते सदैव तंदुरूस्त असतात. आपले आरोग्य निरोगी राहण्यासाठी नियमित योग केला पाहिजे. लहान मुलांनी योगाची आसने शिकून घ्यावीत, असे आवाहन आमदार मायकल लोबो यांनी केले.योग शिक्षक संदीप मोरजकर व राजाराम पिळर्णकर यांनी कार्यक्रमात योगासनांचे प्रशिक्षण दिले.आमदार मायकल लोबो यांनी आभार मानले.

Advertisement

Advertisement
Tags :

.