विविध ठिकाणी योग दिन साजरा
हिंडलगा मध्यवर्ती कारागृह
बेळगाव :
हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात योगदिन साजरा करण्यात आला. योग विद्याधाम फाऊंडेशन व मध्यवर्ती कारागृह यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रम झाला. अधिकारी व कैद्यांनी योगाची प्रात्यक्षिके करून दाखवली. यावेळी विजय मोरे, अच्युत माऊली, अशोक कलबुर्गी, प्रशासकीय अधिकारी बी. एस. पुजारी, साहाय्यक अधीक्षक मल्लिकार्जुन कोण्णूर, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय डुमगोळ, कारागृहाचे अधिकारी व्ही. कृष्णमूर्ती आदी उपस्थित होते. शशिकांत यादगुडे यांनी सूत्रसंचालन केले.
जायंट्स ग्रुप
बेळगाव : बेळगाव जायंट्स ग्रुप व एनएक्सटी लेव्हल फिटनेस यांच्या संयुक्त विद्यमाने योग दिन साजरा करण्यात आला. योगाच्या माध्यमातून शारीरिक, मानसिक व अध्यात्मिक आरोग्याला चालना मिळते. दैनंदिन जीवनात निरोगी व सजगता एकत्रित ठेवण्यासाठी योग करणे आवश्यक आहे. निरोगी समाज ठेवणे हाच योग दिन साजरा करण्याचा उद्देश असून प्रत्येकाने दिवसातील काही वेळ निरोगी जीवनासाठी देण्याचे आवाहन मान्यवरांनी केले. यावेळी विविध आसने, श्वासोच्छवास, ध्यान आदींची प्रात्याक्षिके दाखविण्यात आली.
मराठा लाईट इन्फंट्री
बेळगाव : मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरच्यावतीने आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून योगासन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कमांडंट ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले. उत्तम आरोग्यासाठी प्रत्येक व्यक्तीला योगासनांची गरज आहे. यामुळे नियमित योगासने करावीत, असे आवाहन त्यांनी केले. जवान, त्यांचे कुटुंबीय व शाळेच्या विद्यार्थ्यांनी एकत्रितरित्या योगासने केली. प्राणायाम, हात योगा, ध्यान धारणा यांचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. भारतीय जवानांनी नेहमीच आपल्या शौर्याचे दर्शन घडविले आहे. त्यांच्या मानसिक स्वास्थ्यासाठी हे शिबिर आयोजित करण्यात आले होते.