योगामुळे आजारांना दूर पळविता येते
योग प्रशिक्षक डॉ. सुनिता नागवेकर यांचे प्रतिपादन
पणजी : आधुनिक धावपळीच्या युगात बदलेल्या जीवन पद्धतीमुळे सामोरे जावे लागणाऱ्या मानसिक आजारांना नियमित योगा केल्याने दूर पळविता येते, असे प्रतिपादन ज्येष्ठ गोमंतकीय योग प्रशिक्षक डॉ. सुनिता नागवेकर यांनी केले. कला व सांस्कृतिक खाते आणि कृष्णादास शामा गोवा राज्य मध्यवर्ती ग्रंथालयातर्फे आयोजित आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमात मार्गदर्शन करताना डॉ. नागवेकर बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या की, जीवनात सुख, समाधान, शांती व आनंद मिळविण्यासाठी प्रत्येकाने नियमितपणे योगा कऊन स्वत:ला शारीरिक व मानसिक स्तरावर सक्षम व सुदृढ ठेवणे ही काळाची गरज आहे. यावेळी व्यासपीठावर कला व संस्कृती खात्याचे संचालक सगुण वेळीप, उपसंचालक मिलिंद माटे व दिनेश पवार, मध्यवर्ती ग्रंथालयाचे अभिरक्षक डॉ. सुशांत तांडेल, ज्येष्ठ ग्रंथपाल प्रशांत फडते, योग शिक्षक समेश नाईक व कार्यक्रम प्रमुख स्नेहल चोपडेकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप्रज्वलन कऊन कार्यक्रमाचे उद्घाटन केले. स्नेहल चोपडेकर यांनी स्वागत गीत सादर केले. सूत्रसंचालन दीपिका वेरेंकर यांनी केले.