For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राज्यात 5 जुलैपर्यंत येलो अलर्ट

02:47 PM Jul 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
राज्यात 5 जुलैपर्यंत येलो अलर्ट
Advertisement

जूनमध्ये सांखळीत सार्वाधिक 46 इंच पावसाची नोंद 

Advertisement

पणजी : येत्या दि. 5 जुलैपर्यंत राज्यात सर्वत्र जोरदार पावसाची शक्यता असून त्या दृष्टिकोनातून हवामान खात्याने सावधानतेचा इशारा देत येलो अलर्ट जारी केला आहे. यंदाच्या मौसमात गोव्यात आतापर्यंत जून महिन्यात सर्वाधिक 46 इंच पावसाची नोंद सांखळी येथे झाली आहे. यंदा जूनमध्ये राज्यात समाधानकारक 46 इंच पावसाची सरासरी नोंद झाली. दरवर्षी सांगेमध्ये एव्हाना सर्वाधिक पावसाची नोंद होत होती. गेल्या दोन वर्षांमध्ये पेडणेमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद होत होती. यंदा प्रथमच सांखळी केंद्रामध्ये सर्वाधिक सुमारे 46 इंच एवढी विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासांमध्ये विशेषत: रविवारी दिवसभरात गोव्यातील विविध भागात जोरदार पाऊस पडला. गेल्या 24 तासांमध्ये सर्वाधिक पाऊस वाळपई केंद्रावर नोंदविला आहे. तिथे 3 इंच पेक्षाही जादा पाऊस पडलेला आहे. सांखळीत 2 इंच, जुने गोवे 1.5 इंच, फोंडा 1.25 इंच तर पणजी, काणकोण, मुरगाव व सांगे येथे प्रत्येकी 1 इंच पावसाची नोंद झाली. म्हापसा येथे पाउण इंच, पेडणे येथे सुमारे एक इंच, केपे येथे पाउण इंच, दाबोळी, मडगाव येथे प्रत्येकी अर्धा इंचापेक्षाही कमी पावसाची नोंद झाली.

जून महिन्यातील पाऊस

Advertisement

  • सांखळी 46 इंच
  • म्हापसा 34 इंच
  • पेडणे 36.50 इंच
  • फोंडा 37.50 इंच
  • पणजी 34 इंच
  • जुने गोवे 35 इंच
  • वाळपई 43 इंच
  • काणकोण 42 इंच
Advertisement
Tags :

.