बेळगावसह 10 जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट
2 एप्रिलपासून राज्यभरात मुसळधार पावसाची शक्यता
प्रतिनिधी/ बेंगळूर
2 एप्रिलपासून राज्यभर मुसळधार पावसाची शक्मयता हवामान खात्याने वर्तवली आहे. बेळगाव, धारवाड, कारवार, मंगळूर, उडुपी, गदग, चिक्कमंगळूर, हासन, कोडगू, म्हैसूर जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. गेल्या आठवडाभरापासून राज्यात अनेक ठिकाणी पाऊस पडत आहे. विजयनगर, शिमोगा, तुमकूर, मंड्या, कोलार, दावणगेरे, चित्रदुर्ग, बेंगळूर ग्रामीण, बेंगळूर शहर, यादगिरी, विजापूर, रायचूर, कोप्पळ, कलबुर्गी, बिदरमध्ये मध्यम पाऊस पडेल.
दरम्यान, कलबुर्गी येथे सर्वाधिक 41 अंश सेल्सिअस तर चामराजनगर येथे सर्वाधिक 17.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर भागमंडळात पाऊस पडला आहे. बेंगळूरच्या एचएएलमध्ये कमाल तापमान 34.6 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 20.8 अंश सेल्सिअस, शहरातील कमाल तापमान 34.1 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 22.3 अंश सेल्सिअस, केआयएएलमध्ये कमाल तापमान 34.6 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 21.2 अंश सेल्सिअस, जीव्हीकेमध्ये कमाल तापमान 34.0 अंश सेल्सिअस, किमान तापमान 19.4 अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे.