महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

वार्षिक राशिभविष्य 2024 : कर्क

10:07 AM Jan 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

नेहमी हसतमुख राहिल्याने कर्क राशीच्या व्यक्तींच्या स्वभावाचा कोणाला थांगपत्ता लागत नाही. या व्यक्ती नेहमी मनातून अशांत, असमाधानी, भावूक व संवेदनशील असतात. याना कोणत्याच गोष्टीचा गर्व नसतो. पैशाची कधीच चणचण जाणवत नसल्याने आपल्या माणसांवर या व्यक्ती मनापासून पैसे खर्च करतात. यांना श्रीमंती जगणं जास्त आवडतं. स्वकर्तबगारीवर आपलं नशीब घडवतात.

Advertisement

र्क राशीच्या व्यक्ती आपल्या उत्तम विचार आणि कमालीच्या कल्पनांमुळे ओळखल्या जातात. या व्यक्तींची समज आणि हसमुख स्वभाव सर्वांना आपलंसं करून घेतो. पण या व्यक्तींचा मूड ओळखणं हे एक वेगळंच समीकरण आहे. कर्क राशीच्या व्यक्ती या चंद्राने प्रभावित असल्याने त्यांना नेहमी मानसिक अशांती लाभते. त्यामुळेच कोणत्याही गोष्टीमध्ये या व्यक्ती समाधानी नसतात. सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने दु:खी आणि असंतुष्ट राहतात. या व्यक्ती अत्यंत भावूक, दयाळू आणि संवेदनशील असतात. कोणत्याही गोष्टींचा यांना गर्व नसतो. अत्यंत मूडी आणि रहस्यमयी असतात. तसंच या व्यक्ती क्रिएटिव्ह क्षेत्रामध्ये पुढे जातात. शाळा अथवा महाविद्यालयात यांचे जास्त लक्ष नसले तरीही यांची बौद्धिक क्षमता मात्र दांडगी असते. मोठी कामे पटकन सोडविण्यासाठी या व्यक्ती नेहमीच पुढे असतात. या राशीच्या व्यक्ती वेळेच्या आधीच मोठ्या होतात. अर्थात यांची मॅच्युरिटी लेव्हल जास्त असते. दुसऱ्यांच्या भावना पटकन समजून घेऊ शकतात. आनंद असो वा दु:ख दोन्ही उत्तमरित्या व्यक्त करू शकतात. तसंच या व्यक्ती शहाळ्याप्रमाणे  बाहेरून कडक व मनाने अत्यंत मऊ आणि मृदू. मात्र कोणत्या गोष्टीचं यांना कधी वाईट वाटेल, हे सांगता येत नाही. वाईटपणा या व्यक्तींना सहन होत नाही. यांच्या कमतरतेचा फायदा अनेक लोक उचलतात, हेदेखील खरे आहे. या राशीच्या व्यक्ती आपल्या कुटुंब आणि मित्रांवर मनापासून पैसे खर्च करतात. त्यांच्यासाठी पैसे हे केवळ समाधानाचं साधन आहे. परमेश्वराच्या कृपेने या व्यक्तींना सहसा पैशाची चणचण भासत नाही. या राशीच्या व्यक्ती स्वत:च्या हाताने स्वत:चे नशीब निर्माण करण्यावर भर देतात. तसंच आपल्या कुटुंबाच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी पाण्याप्रमाणे पैसे खर्च करतात. या व्यक्तींना श्रीमंती जगणं जास्त आवडतं. त्यामुळे जास्तीत जास्त कमाई करण्याची यांची इच्छा असते. प्रत्येक गोष्टीमध्ये या व्यक्ती उत्साही असतात. जिथे गरज नाही तिथेही त्यांचा हा उत्साह ओसंडून वाहत असतो. स्वत:बद्दल चांगलं ऐकायला या व्यक्तींना खूप आवडतं. विशेषत: आपल्या जवळच्या माणसांकडून कोणत्याही गोष्टीतील नकार पचवणं या व्यक्तींना थोडं कठीण जातं. आपल्या आजूबाजूला सतत कोणीतरी राहावं आणि आपल्यावर प्रेम करावं, असंच या व्यक्तींना वाटतं.

Advertisement

ग्रहमान

वर्षाची सुरवात बुध आणि शुक्राच्या पाचव्या भावात विराजमान आहे आणि अश्यात, प्रेम आणि आर्थिक जीवनाच्या बाबतीत हे वर्ष तुमच्यासाठी अनुकूल सिद्ध होईल परंतु, सूर्य आणि मंगळाच्या सहाव्या भावात असण्याने शनी महाराज तुमच्या आठव्या भावात होण्याने स्वास्थ्य समस्या वाढू शकतात आणि तुमचे खर्च ही अधिक होऊ शकतात. देव गुरु बृहस्पती दहाव्या भावात असून करिअर आणि कुटुंबात संतुलन स्थापित करण्यात मदतगार सिद्ध होईल आणि 1 मेनंतर तुमच्या अकराव्या भावात जाऊन तुमच्या कमाईमध्ये वृद्धी होईल. धर्म-कर्माच्या बाबतीत तुमची रुची जागृत होईल. गुरु कर्मस्थानात असून पुढे लाभस्थानी जात आहे, हे दोन्ही गुरुचे भ्रमण आपल्यासाठी शुभ फळ देणारे असतील. आरोग्य चांगले राहील. आर्थिक कामकाजात यश मिळेल. कौटुंबिक स्थिती चांगली राहील. समाजात मान प्रतिष्ठा लाभणार आहे. नोकरदार वर्गाला उत्कर्ष कालखंड राहणार आहे. शनी तुमच्या आठव्या भावात होण्याने स्वास्थ्य समस्या वाढू शकतात आणि तुमचे खर्चही अधिक होऊ शकतात. व्यापारात चढ-उतार येत राहतील. परंतु, तुम्ही हिम्मत न हारता आपल्याला काम करण्याची सवय करावी लागेल. शनी या स्थानी अशुभकारक असतो. आरोग्याच्या दृष्टीने स्वास्थ्याच्या दृष्टीने किंवा बारीक सारीक दगदग कटकटी सुरू होतात. वयस्कर मंडळींनी अधिक काळजी घेतली पाहिजे. पण मुळात शनी आपल्या स्वगृही असल्याने त्रास कमी जाणवणार आहे. राहूची उपस्थिती पूर्ण वर्ष तुमच्या नवव्या भावात राहण्याने तुम्हाला तीर्थस्थानावर जाण्याची संधी मिळेल. या वर्षी तुम्हाला विशेषत: आपल्या आरोग्याची काळजी घेण्याची आवश्यकता असेल. केतुचे भ्रमण आपल्यासाठी शुभकारक नाही. भावंडांशी मतभेद, वादविवाद होऊ शकतात. विवाहासाठी वर्षभर उत्तम गुरुबळ आहे.

नोकरदार

कामातून किंवा व्यवसायातून मिळणारे उत्पन्न आणि पत उंचावेल आणि त्यातून अधिक लाभ होईल. विरोधकांची हार, वाढलेली संपत्ती, ज्ञानार्जन आणि वरिष्ठांची कृपादृष्टी राहील. या कालावधीत होणारा प्रवास लाभदायी असेल. हा प्रवास तुम्हाला मानवता, तत्वज्ञान आणि सखोल दृष्टी शिकवेल. व्यावसायिक आणि घरच्या पातळीवरील जबाबदाऱ्या सफाईदारपणे पार पाडाल. वरिष्ठ आणि प्रभावशाली व्यक्तींकडून तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल. व्यावसायिक पातळीवर तुम्ही प्रगती कराल. कुटुंबियांकडून सहकार्य मिळेल. तुमच्यापासून दूर असणाऱ्या किंवा परदेशात असणाऱ्या व्यक्तींकडून सहकार्य मिळेल. तुमची कष्ट करण्याची तयारी असेल तर त्या कष्टाचे चीज होण्यासाठी हा अत्यंत अनुकूल काळ आहे. तुम्ही फार प्रयत्न न करताही तुम्हाला अनेक संधी मिळतील. सामाजिक वर्तुळात तुम्हाला आदर आणि सन्मान मिळेल. तुम्ही नवीन घराचे बांधकाम कराल आणि सगळ्या प्रकारचा आनंद लुटाल. माणसं तुमचा आदर्श ठेवतील आणि सल्ला घेण्यासाठी तुमच्याकडे येतील. सगळ्या समस्या सुटू लागतील. हा सर्व काळ तुमच्यासाठी अत्यंत अनुकूल आणि उर्जेचा राहील. हा काळ दैव, क्षमता आणि धाडसाचा असणार आहे. वरिष्ठांकडून तुम्हाला ऐहिक लाभ मिळेल. त्यामुळे नवीन प्रयत्न करण्यासाठी आणि नवीन ठिकाणी प्रवास करण्यासाठी हा अत्यंत अनुकूल काळ आहे. तुम्ही अनेकांशी संबंध जोडाल आणि यातून चांगल्या प्रकारची देवाण-घेवाण होईल. हा कालावधी तुमच्या भावंडांसाठी आनंद आणि यश घेऊन येईल. अपघातासारखे काही प्रसंग ओढवू शकतात आणि आरोग्याची काळजी घेणेही गरजेचे आहे. अन्नातून होणाऱ्या विषबाधेमुळे पोटाचे विकार संभवतात. तुम्हाला कुठल्या वित्तीय सल्लागाराची आवश्यकता पडू शकते. या वर्षी जिथे धन चांगल्या मात्रेत येते तर तेच खर्चात वृद्धी दर्शविते. संतुलन ठेवा.

स्त्री वर्ग

तुमच्या व्यक्तिगत आयुष्यात, कामाच्या ठिकाणी, मित्रांसमवेत आणि कुटुंबियांसोबत सलोख्याचे संबंध कसे ठेवावेत, यासंबंधी नवीन मार्ग तुम्हाला सापडतील. तुम्ही तुमचे संवादकौशल्य सुधाराल आणि तुमच्या अंतर्मनाशी आणि तुमच्या खासगी गरजांशी प्रामाणिक राहिल्यामुळे त्याचा तुम्हाला योग्य तो मोबदला मिळेल. या काळात तुमच्या आयुष्यात होणारे बदल हे जाणवणारे आणि दीर्घकाळापर्यंत टिकणारे असतील. ज्यांनी तुमच्या कष्टांकडे दुर्लक्ष केले, असे तुम्हाला वाटत होते, तेच तुमचे खंदे सहकारी ठरतील. घरात एखादे धार्मिक कार्य घडेल. हा काळ तुमच्या मुलांसाठी समृद्धी, आनंद आणि यश घेऊन येईल. तुमच्या कारकिर्दीमध्ये एक पुढचे पाऊल टाकण्यासाठी आणि मोठी झेप घेण्यासाठी हा काळ अत्यंत अनुकूल आहे. भागीदार किंवा सहकाऱ्यांकडून तुम्हाला लाभ मिळण्याची शक्यता आहे. जोडीदाराकडून तुम्हाला आनंदाचे क्षण मिळतील. प्रेम आणि रोमान्स या दोन्ही प्रकारात सुख लाभेल. व्यवहार आणि परदेशी प्रवासातून लाभ होईल. आरोग्याच्या तक्रारीमुळे मन:शांती ढळेल. रोजच्या जीवनात स्वयंशिस्त, स्वयंनियंत्रण अंगी बाणवणे तुम्हाला फायदेशीर ठरेल. ताप आणि संधीवातापासून सावध राहा आणि काळजी घ्या. या काळात तुमच्या जोडीदाराची प्रकृती अस्वस्थ होण्याची शक्यता आहे. मनस्ताप करून घेणं टाळून थोडा आराम करायला शिका. अचानक भावनेच्या आहारी जाऊन किंवा अपेक्षाभंगामुळे नोकरी सोडण्याची इच्छा बळावेल, ती दूर करण्याचा प्रयत्न करा. निष्काळजीपणा किंवा दुर्लक्ष केल्यामुळे काही अडचणींचा सामना करावा लागेल. अपघातासारखे काही प्रसंग ओढवू शकतात आणि आरोग्याची काळजी घेणेही गरजेचे आहे. कौटुंबिक आयुष्यात ताण-तणाव निर्माण होतील. तुमच्या संतानामध्ये कलात्मक अभिव्यक्तीची वाढ होईल. तुमचा आनंद गगनात मावणार नाही.

विद्यार्थी वर्ग

विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष खूप संमिश्र परिणाम घेऊन येणार आहे. वर्षाची सुरुवात आव्हानात्मक असू शकते, ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होईल. त्याचवेळी स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अधिक दबाव असेल. या काळात तुम्हाला स्वत:ला सिद्ध करण्याची संधीही मिळेल, पण त्यासाठी तुम्हाला सदैव तयार राहावे लागेल. वर्षाच्या मध्यात विद्यार्थ्यांचे मन एखाद्या गोष्टीने विचलित होऊ शकते परंतु आपले लक्ष विचलित होऊ देऊ नका. परदेशात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना काही अडथळ्यांचा सामना करावा लागू शकतो. वैद्यकीय विद्यार्थ्यांना काही काळ प्रतीक्षा करावी लागू शकते.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article