महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

वार्षिक राशिभविष्य 2024 : मेष

12:37 PM Jan 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मेष राशीच्या व्यक्ती अतिशय संवेदनशील असतात. दुसऱ्यांच्या भावना लवकर समजून घेतात. अग्नि तत्वाची रास असल्याने यांना बऱ्याच गोष्टींची जाणीव आधीपासूनच होत असते. दृढ आत्मविश्वास असल्याने सहजासहजी यांची फसगत होत नाही. स्वतंत्र विचारसरणीच्या असतात.  सदा उत्साही व जिद्दी स्वभावाच्या असतात. स्वत: तर अव्वल दर्जाचे काम करतातच पण दुसऱ्यांकडून कामे करून घेण्यात माहीर असतात.

Advertisement

ष राशीच्या व्यक्तींना स्वत:ची प्रशंसा ऐकून खूपच आनंद होतो. जेव्हा त्यांच्या आवडत्या व्यक्ती त्यांच्यासाठी वेळ काढतात, तेव्हा या व्यक्तींचा आनंद गगनात मावत नाही. या व्यक्ती अतिशय संवेदनशील असतात. दुसऱ्यांच्या भावना लवकर समजून घेतात. मात्र आपल्या भावना सांगताना त्यांना थोडा त्रास होतो. इतरांना योग्य सल्ला देतात, मात्र जेव्हा स्वत:वर वेळ येते तेव्हा त्याच गोष्टी चुकतात. अग्नि तत्वाची रास असल्याने यांना बऱ्याच गोष्टींची जाणीव आधीपासूनच होत असते आणि त्यामुळे त्याचप्रमाणे या राशीच्या व्यक्ती विचार करतात. यांच्यामध्ये चांगला आत्मविश्वास असतो. यांना मूर्ख बनविणे सहजसोपे नाही. समोरची व्यक्ती फसू शकते मात्र या व्यक्ती फसत नाहीत. यांचे डोके नेहमी काही ना काही विचारात निमग्न असते. या व्यक्ती बऱ्याचदा सकारात्मक विचार करतात. मेष राशीच्या व्यक्ती या स्वतंत्र विचाराच्या असतात. प्रेमाच्या बाबतीत खूपच उत्साही असतात. आपल्या जोडीदारावर यांना हक्क गाजवायला आवडतो. मात्र आपल्या आयुष्यात कोणीही लुडबुड केलेली आवडत नाही. मग ती कितीही जवळची व्यक्ती असो. साहस खूपच आवडतं पण त्याचबरोबर मनाला शांतताही त्यांना तितकीच प्रिय असते. यांचे व्यक्तीमत्व हे सर्वात मोठे वैशिष्ट्या आहे. या अतिशय प्रेमळ आणि दयाळू असतात. आपल्या आयुष्यात स्थिरता लाभणार नाही अशी यांना सतत काळजी वाटत असते आणि कोणत्याही नात्यातून आपण वेगळे तर होणार नाही ना याचीही त्यांना चिंता असते. तसंच कंटाळवाणे आयुष्य जगायला या व्यक्तींना आवडत नाही. अतिशय जिद्दी स्वभावाच्या असल्याने एखादी गोष्ट करायची ठरवली तर ती पूर्ण झाल्याशिवाय त्यांना समाधान मिळत नाही. दुसऱ्यांकडून कोणतीही गोष्ट करून घेण्यात या व्यक्ती माहीर असतात. या व्यक्तींवर लोक डोळे बंद करून विश्वास ठेवतात. यांच्यामध्ये खूपच ऊर्जा असल्याने त्या नेहमी उत्साही असतात. मेष राशीचा ग्रह मंगळ असल्यामुळे यांचा शुभ दिवस मंगळवार मानण्यात येतो. या व्यक्ती आपले प्रत्येक काम हे अव्वल दर्जाचेच करतात.

Advertisement

ग्रहमान

शुभ ग्रह बृहस्पती 1 मे 2024 पासून तुमच्या चंद्र राशीच्या दुसऱ्या भावात विराजमान होतील. या काळात तुम्ही करिअरच्या क्षेत्रात उत्तम प्रदर्शन कराल. शनी देवाच्या उपस्थितीमध्ये अकराव्या भावात बृहस्पतीचे हे गोचर तुमच्यासाठी अनुकूल प्रतीत होत आहे. या काळात तुम्हाला आपल्या करिअरमध्ये खूप उत्तम प्रगती पहायला मिळू शकते. एप्रिल2024 पर्यंत धनाच्या प्रभावात चढ-उतार होण्याची शक्यता. तुमच्या खर्चात वृद्धी होऊ शकते कारण, बृहस्पती चन्द्र राशीच्या पहिल्या भावात स्थित असेल. ज्याच्या परिणामस्वरूप, लाभ आणि व्यय/खर्च दोघांचा सामना करावा लागू शकतो. तथापि, 1 मे पासून बृहस्पती चंद्र राशीच्या दुसऱ्या भावात विराजमान होईल आणि हे दर्शवते की, या काळात तुम्हाला उत्तम धन लाभ होईल आणि बचत करण्यातही सक्षम असाल. शनी अकराव्या भावात म्हणजे लाभ आणि इच्छेच्या भावात विराजमान आहे. शनीसारखी ही स्थिती तुमच्या करिअरसाठी अनुकूल असेल. कार्य क्षेत्रात पदोन्नती मिळण्याचे प्रबळ योग, जे तुमच्या भविष्यासाठी उत्तम सिद्ध होईल. परंतु, 29 जून ते 15 नोव्हेंबर 2024 च्या काळात शनीची वक्री झाल्याने तुम्हाला कामात अधिक लक्ष देण्याची आवश्यकता असेल. राहु आणि केतु 2024 च्या वेळी मीन आणि कन्या राशीमध्ये स्थित असेल. बाराव्या भावात राहू आणि सहाव्या भावात केतू उपस्थितीच्या परिणामस्वरूप तुम्हाला मागील वर्षी म्हणजे 2023 च्या तुलनेत या वर्षी अधिक यश प्राप्त होईल. राहू बाराव्या भावात विराजमान होऊन अशांती निर्माण करू शकतो या कारणाने तुमच्या घर-कुटुंबात शांतताभंग होऊ शकतो आणि तुमच्यात अहंकाराची भावना जागृत होऊ शकते. विवाहासाठी वर्षभर उत्तम गुरुबळ आहे.

नोकरदार

भाऊ आणि नातेवाईकांकडून सहकार्य मिळेल. तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी भेट द्याल आणि लोकांकडून मदत घ्याल. तुम्ही केलेल्या कष्टांना आणि प्रयत्नांना यश मिळेल. शत्रू किंवा विरोधक तुम्हाला सामोरे जाण्याचा विचारही करणार नाहीत. कायदेशीर प्रकरणे तुमच्या बाजूने असतील. आर्थिक बाबतीत तुम्हाला नाव, लोकप्रियता, फायदा आणि यश मिळेल. तुमच्या रोमँटिक आयुष्यात थोडी रंगत आणण्याचा हा काळ आहे. तुम्ही मिळवलेली कंत्राटे आणि करार यातून फायदा मिळविण्यासाठी हा कालावधी अनुकूल आहे. या कालावधीत तुम्ही नवीन व्यवहार करू शकता. हे व्यवहार तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरतील. उद्योगातून आणि इतर धंद्यांमधून मिळणाऱ्या उत्पन्नात वाढ होईल आणि तुमची पत व स्थान यातही वृद्धी होईल. तुमच्या खासगी आयुष्यात सौख्य आणण्यासाठीच्या सर्व आवश्यकता पूर्ण झालेल्या असतील. तुम्ही वाहन किंवा इतर आरामदायी वस्तुंची खरेदी कराल. तुमचे आणि कुटुंबाचे सामाजिक स्थान उंचावण्यासाठी हा योग्य कालावधी आहे. तुमच्या उत्पन्नात भरघोस वाढ होण्याचा कालावधी आहे. उत्पन्न आणि बँक बॅलन्समध्ये वाढ होईल. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी हा चांगला काळ आहे. या परिवर्तनाच्या काळात नवीन मित्र आणि नाती जोडली जातील आणि त्यांच्यापासून तुम्हाला लाभ होईल. पूर्वीच सुरू केलेले काम आणि नव्याने सुरू केलेले काम याचा तुम्हाला हवा तसा निकाल मिळेल. तुमच्या इच्छापूर्तीचा हा काळ आहे. नवीन व्यवसाय सुरू कराल किंवा नवीन करार होतील. वरिष्ठ पदावरील आणि प्रभावशाली व्यक्तींकडून सहकार्य मिळण्याची अपेक्षा आहे. सर्वांगीण समृद्धी या काळात लाभेल. तुमच्या जोडीदाराशी असलेल्या नात्याची अधिक काळजी घ्यावी लागेल.

स्त्री वर्ग

तुमच्यासमोरील आव्हानांवर मात करण्यासाठी तुम्ही नव्या कल्पना लढवाल. व्यवहार अत्यंत सुरळीत आणि सहज पार पडतील कारण तुम्ही तुमच्या स्पर्धकांच्या एक पाऊल पुढे असाल. एकाहून अधिक स्रोतांमधून तुम्हाला उत्पन्न मिळेल. तुमचे सहकारी आणि इतर संबंधित व्यक्ती यांच्याशी असलेले तुमचे संबंध सुधारतील. तुम्ही या काळात काही चैनीच्या वस्तू विकत घ्याल. एकूणातच हा काळ तुम्हाला उत्पन्न मिळवून देणारा असेल. अध्यात्मिक बाजूकडे लक्ष दिल्यास तुमच्या व्यक्तिगत इच्छा पूर्ण होतील आणि तात्विक बदल जो घडेल त्याचा थेट संबंध तुमच्या वृद्धीशी असणार आहे. आपण शिकत असलेला अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण कराल. तुमच्या आत जे काही बदल घडत आहेत, ते उघडपणे व्यक्त करण्याची हीच वेळ आहे. तुमची तत्वे व्यक्तिगत पातळीवर आणि सामाजिक पातळीवर राबविण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. तुमचे बाह्यरूप सकारात्मक राहील आणि तुमचे शत्रू अडचणीत येतील. तुमच्या संकल्पना प्रत्यक्षात उतरवाल, तेव्हा तुम्हाला आर्थिक लाभ होईल. सरकार आणि प्रशासनासोबत काम कराल आणि त्या कामात तुम्हाला यशही मिळेल. व्यापारात वृद्धी आणि कामात बढती मिळेल. कौटुंबिक सुख लाभेल. तुमच्या योजना कार्यान्वित करण्यासाठी हा अत्यंत योग्य समय आहे. वैवाहिक सुखासाठी ही ग्रहदशा अत्यंत अनुकूल आहे. आध्यात्मिक जगाचे दरवाजे तुमच्यासाठी उघडतील, परंतु तेथील संधींचा लाभ घेण्याआधी काही तयारीची आवश्यकता आहे. अपत्यप्राप्तीची अपेक्षा करत असाल तर सुरक्षित प्रसूती होईल. तुमच्या लिखाणाची प्रशंसा होईल. धाडसी व्हाल आणि एका वेगळ्या उंचीवर पोहोचाल. वैवाहिक आयुष्यात आनंद लाभेल. प्रभावशाली व्यक्तींशी असलेले तुमचे संबंध वृद्धिंगत होतील. तुमचे शत्रु तुम्हाला सामोरे येऊ शकणार नाहीत.

विद्यार्थी वर्ग

विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष चांगले राहील कारण या वर्षी तुमचे धैर्य वाढेल. यासोबतच कुटुंब आणि मित्रांकडूनही भरपूर मदत मिळेल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढेल आणि ते अधिक मेहनतीने अभ्यास करतील. शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासाबाबत पालक थोडे आक्रमक होऊ शकतात. हॉस्पिटॅलिटी आणि पॅरा मेडिकल करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष अनुकूल असेल आणि ते स्वत:ला सिद्ध करण्याची एकही संधी सोडणार नाहीत. पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वर्षाचा मध्य चांगला असेल, तुम्हाला अनेक संधीही मिळतील.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article