कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

हर हर महादेव...च्या जयघोषात धामणे बसवाण्णा देवाचा यात्रोत्सव उत्साहात

10:29 AM Apr 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वार्ताहर /धामणे

Advertisement

हर हर महादेव....च्या जयघोषात धामणे येथील बसवाण्णा देवाचा यात्रोत्सव दोन दिवस पारंपरिक आणि विधिवत इंगळ्याचा कार्यक्रमाने उत्साहात पार पडला. प्रतिवर्षाप्रमाणे दि. 1 रोजी येथील बसवाण्णा देवाची यात्रा पारंपरिक पध्दतीने हर हर महादेवाच्या जयघोषात इंगळ्यांच्या गाड्याने सुरू झाली. सकाळी कलमेश्वर मंदिरपासून सवाद्य बैलजोड्यांची मिरवणूक गुलालाची उधळण करत बसवाण्णा मंदिरपर्यंत आली. येथील बसवाणा मंदिर आवारात इंगळ्या झाल्या. दुपारी 4 वाजता गावातील हक्कदारांनी अंबिल गाड्यांची देवस्थान पंचकमिटीच्या उपस्थितीत सवाद्य मिरवणूक निघाली. बसवाण्णा मंदिर येथे अंबिलचे वाटप करण्यात येऊन परंपरेप्रमाणे गाडे पळविण्यात आले. रात्री 10 वा. कन्नड शाहीर गाण्यांचा कार्यक्रम झाला. मंगळवार दि. 2 रोजी सकाळी 9 नंतर गावातील प्रत्येक मंडळाच्या वतीने बैलजोड्यांची सवाद्य मिरवणूक निघाली. दुपारी 1 वाजता बसवाण्णा मंदिरासमोर इंगळ्या पूजन करून पेटविण्यात आल्या. सायंकाळी 5 वा. हजारो भाविक आणि देवस्थान पंच व हक्कदार यांच्या उपस्थितीत बसवाण्णा देवाला बाशिंग बांधण्यात येऊन नारळ उडविण्यात आले. त्यानंतर देवाला गाऱ्हाणे घालण्यात येऊन इंगळ्यांचा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी शेकडो भाविकांनी देवाचे दर्शन घेतले. रात्री 10 वा. कोल्हापूर येथील मराठी नाट्याप्रयोग सादर करण्यात आले.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article