महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

वडगाव मंगाईदेवीची आज यात्रा

11:53 AM Jul 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मंदिराचे सुशोभिकरण : वाहतूक नियंत्रणासाठी बॅरिकेड्स : प्रशासनही सज्ज

Advertisement

बेळगाव : नवसाला पावणारी देवी म्हणून ओळख असणाऱ्या मंगाईदेवीची यात्रा मंगळवार दि. 30 रोजी मोठ्या जल्लोषात साजरी होणार आहे. या निमित्ताने संपूर्ण वडगाव परिसरात जत्रेची जोमात तयारी सुरू आहे. मंदिरासह वडगावमधील घरांना आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून परिसरात गर्दी टाळण्यासाठी बॅरिकेड्स उभारण्यात आले आहेत. त्याचबरोबर वडगावच्या मुख्य मार्गांवर खेळणी तसेच खाद्यपदार्थांचे स्टॉल उभारले आहेत.

Advertisement

शेकडो वर्षांच्या परंपरेनुसार वडगावला मंगाईदेवीची यात्रा भरविली जाते. मंगाईदेवीचे मंदिर लहान असले तरी महिमा अगाध असल्यामुळे हजारो भाविकांचे मंगाईदेवी श्रद्धास्थान आहे. मंगळवारी यात्रेचा मुख्य दिवस असून या निमित्ताने प्रशासनासोबत वडगाववासीयांनी जय्यत तयारी केली आहे. मंगाईनगर परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. मंदिरालाही आकर्षक फुलांची सजावट केल्याने मंदिर परिसर फुलला आहे.

लाखो भाविक यात्रेसाठी येत असल्यामुळे पोलीस प्रशासनाकडून ठिकठिकाणी बॅरिकेड्स लावून रस्ते बंद करण्यात आले आहेत. गर्दी टाळण्यासाठी वडगाव बसेस येळ्ळूर क्रॉस येथून वळविल्या जाणार आहेत. मागील वर्षी झालेली दुचाकी व चार चाकी वाहनांची गर्दी टाळण्यासाठी यावर्षी मोठ्या वाहनांना आतमध्ये प्रवेश करू दिला जाणार नाही. याबरोबरच प्रशासनाने सीसीटीव्हीची व्यवस्था केली आहे.

आज गाऱ्हाणे उतरविणार

मंगाईदेवीच्या यात्रेनिमित्त वडगावात महिनाभरापासून वार पाळले जात होते. मंगळवारी सकाळी 11 वाजता मानकरी चव्हाण-पाटील घराण्याकडून गाऱ्हाणे घालून वार उतरविले जाणार आहे. गाऱ्हाणे घातल्यानंतर यात्रेला सुरुवात होणार आहे. यात्रेकरूंना देवीचे दर्शन सुलभ व्हावे, यासाठी गर्दीचे नियोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी रांगेतूनच दर्शन घेण्याचे आवाहन मंगाईदेवी ट्रस्टच्यावतीने करण्यात आले आहे. यात्रेमध्ये मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होत असतात. त्यामुळे खेळणी, गृहोपयोगी साहित्य, खाद्यपदार्थ यांचे वडगावमध्ये जागोजागी स्टॉल उभे करण्यात आले आहेत. येळ्ळूर क्रॉसपासून मंदिर परिसरापर्यंत स्टॉल उभारण्यात आले आहेत. याबरोबरच लहान मुलांसाठी झोपाळे, पाळणे यात्रेमध्ये दाखल झाले आहेत.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article