For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

यात्रा-जात्रा तोंडावर, बकरी बाजाराला बहर

06:22 AM Feb 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
यात्रा जात्रा तोंडावर  बकरी बाजाराला बहर
Advertisement

बकरी बाजारातून मोठी उलाढाल :

Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

यात्रा, जात्रांना प्रारंभ झाल्याने शनिवारी बकरी बाजाराला बहर आला होता. दड्डी-मोदगा यासह खानापूर तालुक्यातील करंबळ आणि इतर गावातील यात्रा तोंडावर आल्या आहेत. त्यामुळे बकऱ्यांना मागणी वाढली होती. शनिवारी बकरी बाजारातून मोठी उलाढाल झाली.

Advertisement

रविवारपासून दड्डी ता. हुक्केरी) येथील भावेश्वरी यात्रेला प्रारंभ होत आहे. त्यामुळे शनिवारी बकरी बाजाराला तेजी आली होती. त्याबरोबर कोंबड्यांची विक्रीही मोठ्या प्रमाणात झाली. साधारण 8 ते 15 हजार रुपयांपर्यंत लहान, मोठ्या बकऱ्यांच्या किंमती होत्या. तर 600 रुपये एक प्रमाणे कोंबडे विक्री करण्यात आले. यात्रा तोंडावर आल्याने बकरी आणि कोंबड्यांची विक्री वाढू लागली आहे.

यात्रा-जात्रा आणि माही यात्रेला सुरूवात झाली आहे. या यात्रेसाठी मोठ्या प्रमाणात बकऱ्यांची आणि कोंबड्यांची खरेदी-विक्री होते. त्यामुळे बऱ्याच दिवसानंतर बकरी आणि कोंबडी बाजाराला बहर आला होता. गणपत गल्लीत शनिवारी ग्रामीण भागातून काही महिलांनी कोंबडे विक्रीसाठी आणले होते. ग्रामीण भागातून शेळ्या आणि लहान मोठे पालवे याबरोबर तालुक्यातून मेंढे विक्रीसाठी आले होते.

Advertisement
Tags :

.