महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

श्रीक्षेत्र सोगल सोमनाथाचा आजपासून यात्रा महोत्सव

01:30 AM Mar 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

तीन दिवस भरगच्च धार्मिक कार्यक्रम

Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisement

महाराष्ट्र, कर्नाटक, गोव्यासह विविध राज्यांतील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र सोगल (ता. बैलहोंगल) सोमेश्वर यात्रा महोत्सव रविवार दि. 17 मार्चपासून सुरू होणार असून तीन दिवस ही यात्रा चालणार आहे.

रविवारी सकाळी 6 वा. रुद्राभिषेक, दुपारी महाप्रसाद, रात्री शिवभजन, शिवकीर्तन होणार आहे. सोमवार दि. 18 रोजी सकाळी 6 ते 8 पर्यंत महारुद्राभिषेक होणार आहे. हणबरट्टी हिरेमठाचे श्री बसवलिंग शिवाचार्य स्वामीजींच्या उपस्थितीत सकाळी 8 ते 10 पर्यंत लिंगदीक्षा व अय्याचार कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी 4 वा. चांदीचा रथोत्सव, 5 वा. धर्मसभा व रात्री 9 वा. शुभमुहूर्तावर शिवपार्वतीचा अक्षतारोपण कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर भजन, कीर्तन व इतर सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.

तिसऱ्या दिवशी मंगळवार दि. 19 रोजी सकाळी 6 पासून रुद्राभिषेक, त्यानंतर महाप्रसाद होणार आहे. सायं. 4 वा. श्री सोमेश्वर रथोत्सव होणार आहे, अशी माहिती श्रीक्षेत्र सोगल ट्रस्टचे अध्यक्ष वीरनगौडा संगण्णावर यांनी दिली. या यात्रा महोत्सवात अनेक मठाधीश व राजकीय नेते उपस्थित राहणार आहेत.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article