यतिंद्र यांच्या व्हायरल व्हिडिओने खळबळ
विरोधकांची मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर टीका : शाळांच्या बांधकामाबाबत संभाषण असल्याचे मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण
बेंगळूर : यतिंद्र सिद्धरामय्या यांनी ‘हॅलो पप्पा’ असे जनतेसमोरच मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याशी बोलत असतानाच्या व्हायरल व्हिडिओने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. हाच मुद्दा उचलून धरत विरोधकांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. मात्र, यावर प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी राजकीय जीवनात एक तरी अधिकाऱ्यांची बदली केल्याचे उघड झाल्यास राजकारणातून संन्यास घेण्याचे आव्हान दिले आहे. पुत्र यतिंद्र यांचे व्हिडिओ संभाषण व्हायरल झाल्यानंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बेंगळूर येथे पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिले. 5 नावांचा उल्लेख केल्यास ते बदली होऊ शकते का? या विषयात कुमारस्वामी यांचे विधान राजकीय हेतूने प्रेरित होते. सीएसआर अंतर्गत शाळांचे बांधकाम सुरू आहे. मुलाने ती बाब नमूद केल्याचे सिद्धरामय्या यांनी स्पष्ट केले.
यतिंद्र यांचे वक्तव्य व्हायरल होताच अनेक मंत्री मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या पाठिशी उभे राहिले आहे. सिद्धरामय्या यांनी सोशल मीडियावरही प्रतिक्रिया दिली आहे. सत्तेत असताना लाच-कमिशनच्या धंद्यात बुडणारे माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांचे काम आपण स्वत:च्या डोळ्याने पाहिले आहे. वऊणा मतदारसंघातील शाळांच्या विकासाबाबत झालेल्या सार्वजनिक दूरध्वनी संभाषणाला कुमारस्वामी यांनी बदली म्हणून जोडले आहेत. या क्षुल्लक वागणुकीबद्दल मला खेद वाटतो, असे ते म्हणाले. केडीपीचे सदस्य असलेले माजी आमदार यतिंद्र हे त्या मतदारसंघाच्या विकासासाठी झटत आहेत. सीएसआर निधी वापरून परिसरातील सरकारी शाळा सुधारण्यात त्यांचा सहभाग आहे. यासंदर्भात त्यांनी माझ्याशी शाळांच्या यादीबाबत चर्चा केली. मतदारसंघातील लोकांसमोर झालेल्या या संभाषणाचा अर्थ कुमारस्वामींनी बदलीसाठी केला आहे. हा त्यांच्या विकृत मनाचा आरसा आहे, असा टोलाही सिद्धरामय्यांनी लगावला.
आर. अशोक यांचा आरोप
मुख्यमंत्र्यांचा मुलगा आज सत्तेचा वापर करतो असे नाही, तर राज्यात काँग्रेसचे सरकार आल्यापासून यतिंद्र मुख्यमंत्रिपदाचा वापर करत असल्याचा आरोप भाजप नेते आर. अशोक यांनी केला.
यतिंद्रच्या व्हायरल संभाषणाचा तपशील
यतिंद्र सिद्धरामय्या यांनी वऊणा विधानसभा कार्यक्षेत्राच्या म्हैसूर तालुक्मयातील चटनहळ्ळी गावात सार्वजनिकांकडून तक्रारी स्वीकारत होत्या. यावेळी त्यांनी वडील सिद्धरामय्या यांच्याशी संपर्क साधून काहीतरी प्रस्ताव मांडला आणि मी दिलेली यादी तयार करा, असे सार्वजनिकांसमोरच बोलल्याने चर्चेला ऊत आला आहे. सुरवातीला यतिंद्र यांनी ‘सांगा पप्पा’ असे म्हणत बोलायला सुऊवात केली. यावेळी सिद्धरामय्या यांनी विवेकानंद कोण असा सवाल केला. त्यानंतर यतिंद्र यांनी महादेवला फोन देण्यास मुख्यमंत्र्यांना सांगत आहे. सिद्धरामय्या यांच्याशी बोलताना महादेवप्पा यांचे नाव पुढे आले. ते मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय आहेत. मूळचे सब-रजिस्ट्रार असलेले महादेव आता मुख्यमंत्र्यांचे विशेष कर्तव्य अधिकारी म्हणून नियुक्त झाले आहेत. महादेव हे यतिंद्र यांचे जवळचे मित्र आहेत. सिद्धरामय्या मुख्यमंत्री झाल्यामुळे सब-रजिस्ट्रार महादेव यांची मुख्यमंत्र्यांचे विशेष कर्तव्य अधिकारी म्हणून यतिंद्र यांनी नियुक्ती केल्याची चर्चा आहे.
मुख्यमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा : कुमारस्वामी
पैशासाठी पदांच्या घोटाळ्यात सहभागी असलेले मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री, निजदचे प्रदेशाध्यक्ष एच. डी. कुमारस्वामी यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात सुरू असलेल्या बदली घोटाळ्याबाबत सिद्धरामय्या यांचे पुत्र डॉ. यतिंद्र सिद्धरामय्या यांच्याविषयीचा व्हिडिओ समोर आल्यानंतर बेंगळुरातील पक्षाच्या कार्यालयात पत्रकारांशी ते बोलत होते. जे समोर आले आहे. मुख्यमंत्री, त्यांचा मुलगा, त्यांचे कार्यालय अधिकाऱ्यांच्या बदलीच्या व्यवहारात गुंतल्याचे आपण अनेकवेळा आरोप केला होता. आता हा आरोप खरा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.