For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

यास्त्रेम्स्का, किनवेन, मेदवेदेव्ह, सिनर, बोपण्णा-एब्डन उपांत्य फेरीत

06:50 AM Jan 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
यास्त्रेम्स्का  किनवेन  मेदवेदेव्ह  सिनर  बोपण्णा एब्डन उपांत्य फेरीत
Advertisement

कार्लोस अल्कारेझ, कॅलिनस्काया, नोस्कोव्हा, रुबलेव्ह, हुरकाझ पराभूत

Advertisement

वृत्तसंस्था/ मेलबर्न

युक्रेनच्या डायाना यास्त्रेम्स्काने झेकच्या लिंडा नोस्कोव्हाची ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम स्पर्धेतील स्वप्नवत घोडदौड उपांत्यपूर्व फेरीत रोखत पहिल्यांदाच ग्रँडस्लॅमची उपांत्य फेरी गाठली. चीनच्या बाराव्या मानांकित झेंग किनवेननेही उपांत्य फेरी गाठली असून तिने रशियाच्या अॅना कॅलिन्स्कायाचा पराभव केला. पुरुष एकेरीत रशियाचा डॅनील मेदवेदेव्ह, इटलीचा यानिक सिनर यांनीही उपांत्य फेरी गाठली तर रुबलेव्ह व द्वितीय मानांकित कार्लोस अल्कारेझ यांचे आव्हान समाप्त झाले.

Advertisement

यास्त्रेम्स्काने झेक प्रजासत्ताकच्या 19 वर्षीय नोस्कोव्हाचा 6-3, 6-4 असा पराभव करीत शेवटच्या चारमध्ये स्थान मिळविले. पात्रता फेरीतून आलेल्या यास्त्रsम्स्काने 78 मिनिटांत हा सामना संपवला. उपांत्य फेरी गाठणारी ती दुसरी पात्रता फेरीतून आलेली खेळाडू आहे. तिची उपांत्य लढत चीनच्या झेंग किनवेनशी होईल. नोस्कोव्हाने अग्रमानांकित इगा स्वायटेकला पराभवाचा धक्का दिला होता. चीनच्या बाराव्या मानांकित किनवेनने संथ सुरुवातीवर मात करीत रशियाच्या अॅना कॅलिनस्कायाचा 6-3, 6-1 असा पराभव केला. कॅलिनस्काया प्रथमच ग्रँडस्लॅमच्या उपांत्यपूर्व फेरीत पोहोचली होती.

पुरुष एकेरीत रशियाच्या मेदवेदेव्हने रोमांचक ठरलेल्या उपांत्यपूर्व सामन्यात ह्युबर्ट हुरकाझचा 7-6 (7-4), 2-6, 6-3, 5-7, 6-4 असा पराभव करून उपांत्य फेरीत स्थान मिळविले. या स्पर्धेत शेवटच्या चारमध्ये स्थान मिळविण्याची त्याची ही तिसरी वेळ आहे. सुमारे चार तास ही लढत रंगली होती. त्याची उपांत्य लढत अलेक्झांडर व्हेरेव्हशी होईल. इटलीच्या 22 वर्षीय यानिक सिनरने दुसऱ्यांदा ग्रँडस्लॅमची उपांत्य फेरी गाठताना रशियाच्या पाचव्या मानांकित आंद्रे रुबलेव्हवर 6-4, 7-6 (7-5), 6-3  अशी मात केली. मागील वर्षी त्याने विम्बल्डन स्पर्धेतही उपांत्य फेरी गाठली होती. दोनदा ग्रँडस्लॅमची उपांत्य फेरी गाठणारा मॅटेव बेरेटिनीनंतरचा दुसरा इटालियन खेळाडू आहे. अन्य एका सामन्यात जर्मनीच्या सहाव्या मानांकित अलेक्झांडर व्हेरेव्हने दुसऱ्या मानांकित स्पेनच्या अल्कारेझचे आव्हान 6-1, 6-3, 6-7 (2-7), 6-4 असे संपुष्टात आणत उपांत्य फेरी गाठली.

बोपण्णा बनला डबल्समधील सर्वात वयस्कर अग्रमानांकित

भारताचा 43 वर्षीय रोहन बोपण्णा दुहेरीतील अग्रक्रमांक पटकावणारा सर्वात वयस्कर खेळाडू बनला असून त्याने मॅथ्यू एब्डनसमवेत या स्पर्धेची प्रथमच उपांत्य फेरी गाठली आहे. या स्पर्धेत भाग घेण्यापूर्वी तो तिसऱ्या क्रमांकावर होता. बोपण्णा-एब्डन यांनी सहाव्या मानांकित अर्जेsिन्टनाच्या मॅक्झिमो गोन्झालेझ व आंद्रेस मोल्टेनी यांचा 6-4, 7-6 (7-5) असा पराभव केला. पावणेदोन तास ही लढत रंगली होती.

Advertisement
Tags :

.