For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

यशवंतपूर-पंढरपूर रेल्वे दररोजसाठी प्रयत्न

10:52 AM Jun 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
यशवंतपूर पंढरपूर रेल्वे दररोजसाठी प्रयत्न
Advertisement

खासदार विश्वेश्वर हेगडे : रेल्वेमंत्र्यांची भेट घेऊन केली चर्चा, आषाढी वारीसाठी आजपासून रेल्वेसेवा सुरू

Advertisement

खानापूर : आठवड्यातून एकदा सुरू असलेली यशवंतपूर-पंढरपूर रेल्वे दररोज सुरू करण्यात यावी, अशी मागणी कारवारचे खासदार विश्वेश्वर कागेरी-हेगडे यांनी मंगळवार दि. 25 रोजी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांची भेट घेऊन चर्चा केली. आणि दररोज रेल्वे सुरू करण्यासंदर्भात निवेदनही सादर केले. दररोज यशवंतपूर-पंढरपूर रेल्वे सुरू करण्यासंदर्भात रेल्वेमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. तसेच सध्या हुबळी-पंढरपूर आणि बेंगळूर-पंढरपूर ही रेल्वेसेवा आषाढी एकादशीनिमित्त सुरू करण्याचे आदेश रेल्वेमंत्र्यांनी हुबळी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच यशवंतपूर-पंढरपूर दररोज रेल्वे सुरू करण्यासंदर्भात रेल्वे अधिकाऱ्यांना आदेश दिले असल्याचे खासदार विश्वेश्वर हेगडे यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना सांगितले.

सध्या यशवंतपूर-पंढरपूर रेल्वेसेवा आठवड्यातून एकदा सुरू आहे. धारवाड, बेळगाव, सांगली या जिल्ह्यातून पंढरपूरला मोठ्या प्रमाणात भाविक जातात. हल्याळ, खानापूर, बेळगाव परिसरातही वारकरी सांप्रदाय मोठ्याप्रमाणात आहे. मात्र अपेक्षित रेल्वेसेवा नसल्याने वारकऱ्यांना पंढरपूरला जाताना मिरजला जावून दुसऱ्या रेल्वेने जावे लागत आहे. त्यामुळे वेळ आणि पैशाचा अपव्यय होत आहे. ही बाब खासदार विश्वेश्वर हेगडे यांच्या निदर्शनास आणून दिली असून त्यांच्याकडे पंढरपूरसाठी रेल्वे सुरू करण्यात यावी, आणि खानापूर रेल्वे स्थानकात थांबा देण्यात यावा, अशी मागणी खानापूर तालुक्यातील वारकऱ्यांनी लेखी निवेदन देऊन केली होती.

Advertisement

खासदार विश्वेश्वर हेगडे यांनी याची दखल घेत शपथविधी पार पडल्यानंतर तातडीने रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांची मंगळवारी भेट घेऊन पंढरपूरसाठी नवी रेल्वे सुरू करावी, तसेच यशवंतपूर-पंढरपूर रेल्वेसेवा दररोज करावी, अशी मागणी करून निवेदन सादर केले. तसेच आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरसाठी रेल्वेसेवा सुरू करण्याची मागणी केली. याबाबत रेल्वेमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत आषाढी वारीसाठी बेंगळूर-पंढरपूर, हुबळी-पंढरपूर आणि बेंगळूर-पंढरपूर ही रेल्वेसेवा दि. 26 पासून सुरू होणार असल्याचे जाहीर केले आहे. तसेच यशवंतपूर-पंढरपूर ही रेल्वेसेवा आठवड्यातून एकदा आहे. ती दररोज सुरू करण्यासाठी निश्चित प्रयत्न केले जातील, असा सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे विश्वेश्वर हेगडे यांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.