For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बालिकेवर लैंगिक अत्याचार करून खून करणाऱ्या नराधमाला फाशी

12:01 PM Sep 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
बालिकेवर लैंगिक अत्याचार करून खून करणाऱ्या नराधमाला फाशी
Advertisement

विशेष पोक्सो न्यायालयाचा निकाल

Advertisement

बेळगाव : घरासमोर खेळत असलेल्या साडेतीन वर्षांच्या मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून  तिच्यावर लैंगिक अत्याचार करून खून करणाऱ्या नराधमाला न्यायालयाने फाशीची शिक्षा आणि 45 हजार रुपये दंड ठोठावला आहे. उद्याप्पा रामाप्पा गाणगेर (वय 32) रा. कुरुबगोडी (हारुगेरी), ता. रायबाग असे त्या नराधमाचे नाव आहे. या आरोपीने दि. 21 सप्टेंबर 2017 रोजी घरासमोर खेळत असलेल्या मुलीला चॉकलेट देतो, असे सांगून उसात नेले. त्या ठिकाणी तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर तिचा खून केला. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली होती. या आरोपीबद्दल संताप व्यक्त करण्यात आला. त्यानंतर त्याच्या विरोधात हारुगेरी पोलीस स्थानकामध्ये भादंवि 366(ए), 376, 302, 201 आणि 4, 6, 12 पोक्सो अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी फिर्याद दिल्यानंतर त्या नराधमाला अटक करण्यात आली होती. तत्कालिन पोलीस निरीक्षक सुरेश शिंगे यांनी या प्रकरणाचा तपास करून आरोपीला अटक करून येथील पोक्सो न्यायालयामध्ये दोषारोप दाखल केले. न्यायालयामध्ये 24 साक्षीदार, 52 कागदोपत्री पुरावे, 8 मुद्देमाल तपासण्यात आले. त्यामध्ये उद्याप्पा हा दोषी आढळला. सरकारी वकील एल. व्ही. पाटील यांनी घडलेली घटना ही अत्यंत निर्दयी आहे. त्यामुळे आरोपीला फाशी द्यावी, अशी मागणी न्यायालयासमोर मांडली. न्यायाधीश सी. एम. पुष्पलता यांनी भादंवि 302 आणि पोक्सो कायद्यांतर्गत या नराधमाला फाशी ठोठावली आहे. याचबरोबर पीडित मुलीच्या कुटुंबीयांना 3 लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी, असा आदेशही सरकारला बजावला आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.