For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मध्यवर्ती कुस्तीगीर संघटनेतर्फे यशपालसिंग सत्कार

09:45 AM Mar 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
मध्यवर्ती कुस्तीगीर संघटनेतर्फे यशपालसिंग सत्कार
Advertisement

कुस्ती प्रशिक्षकपदासाठी पदविका अभ्यासक्रम प्रथम श्रेणीत उतीर्ण

Advertisement

बेळगाव : प्राधिकरणाच्या वतीने घेण्यात आलेला अभ्यासक्रम पूर्ण करुन त्यांना अ श्रेणी प्राप्त केली आहे. पंजाब मधील पटियाळा येथील नेताजी सुभाषचंद्र नॅशनल इन्स्टिटूट ऑफ स्पोर्ट्स कुस्ती प्रशिक्षकपदासाठी असणारा पदविका अभ्यासक्रम त्यांनी पूर्ण केला आहे. प्रथम श्रेणीत उतीर्ण झाल्यामुळे बेळगाव मध्यवर्ती कुस्ती संघटनेतर्फे यशपाल सिंगचा खास सत्कार करण्यात आला. केंद्रीय क्रिडा मंत्रालयाच्या खेल प्राधिकरणामार्फत हा अभ्यासक्रम घेण्यात येतो. तो पूर्ण करून यात त्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. या निमित्त मध्यवर्ती कुस्तीगीर संघटना बेळगाव यांच्या वतीने बेळगावचे प्रसिद्ध कॉन्ट्रॅक्टर तसेच सामाजीक कार्यकर्ते व श्रीराम बिल्डर डेव्हलपर्सचे संचालक गोविंद रामचंद्र टक्केकर यांच्या हस्ते खास गौरव करण्यात आला. यावेळी गुरू  मारूती घाडी यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात. यावेळी संघटनेचे परशूरामभाऊ नंदिहळ्ळी यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच बेळगावचे कुस्ती ठेकेदार बाळाराम पाटिल यांच्या कुटुंबीयांची वतीनेही  यशपाल यांचा सत्कार करण्यात आला. यशपाल यांना बेळगाव मध्यवर्ती कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष  मारूती घाडी, त्यांचे वडील नवरत्नसिंग तसेच मध्यवर्ती कुस्तीगीर संघटनेच्या सदस्यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी  संतोष होंगल कुस्ती ठेकेदार बाळाराम पाटिल सामाजिक कार्यकर्ते मल्लेश चौगुले, भरमा पुणूजगौडा, सुरज घाडी, गजानन साबण्णावर आदी उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Tags :

.