यशदीप भोगे, अंशिका कुमारीची आगेकूच
वृत्तसंस्था/ ढाका, बांगलादेश
येथे सुरू झालेल्या आशियाई तिरंदाजी चॅम्पियनशिपमध्ये पुरुषांच्या रिकर्व्ह पात्रता फेरीत भारताच्या यशदीप भोगेने कोरियाच्या तिरंदाजाला चकित केले तर महिला विभागात नवोदित अंशिका कुमारीनेही टॉप पाचमध्ये स्थान मिळवित सर्वांना चकित केले.
या दोघांच्या शानदार प्रदर्शनामुळे भारताला सांघिक विभागात दुसरा क्रमांक मिळाला. कोरियाने अपेक्षेप्रमाणे पुरुष व महिला दोन्ही विभागातील पात्रता फेरीत पहिले स्थान मिळविले. भारताच्या रिकर्व्ह तिरंदाजांना दीर्घ काळापासून पुरुषांना पदके जिंकता आलेली नाहीत तर 2023 मधील स्पर्धेत भारताच्या महिला संघाने एकमेव कांस्यपदक मिळविले होते. भोगे व अंशिका यांच्या प्रदर्शनामुळे आता भारताच्या पदकाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. काही धक्कादायक निकालही पहावयास मिळाले. सांघिक विभागात दीपिका कुमारी व धीरज बोम्मदेवरा यांना आगेकूच करण्यात अपयश आले. दोन वर्षानंतर पुनरागमन करणाऱ्या भोगेने पात्रता फेरीत 720 पैकी 687 गुण मिळवित कोरियाच्या सेओ मिन्गी (681) व किम येआचन (679) यांना मागे टाकून पहिले स्थान मिळविले.
कंपाऊंड विभागात भारतीयांनी पुन्हा एकदा चांगली कामगिरी केली. पात्रता फेरीत महिला संघाने वर्चस्व राखत भारताच्या चारही स्पर्धकांनी टॉप पाचमध्ये स्थान मिळविले. 20 वर्षीय दीपशिखाने (705) पहिले, कोरियाच्या पार्क येरिनने (704) दुसरे, ज्योती सुरेखा वेन्नमने (703) तिसरे, 17 वर्षीय पृथिका प्रदीपने (702) चौथे स्थान मिळविले. याशिवाय 20 वर्षीय चिकिता तनिपार्थीने 701 गुणांसह पाचवे स्थान मिळविले. पण फक्त टॉप तीन खेळाडूंनाच पुढील फेरीत स्थान दिले जाते. पुरुषांच्या कंपाऊंड पात्रता फेरीत अभिषेक वर्माने (713) दुसरे, कोरियाच्या किम जाँगहोने (715) पहिले, साहिल जाधवने (709) चौथे व प्रथमेश फुगेने (707) सहावे स्थान मिळविले. मात्र सांघिक विभागात भारताला दुसरे मानांकन मिळाले. मिश्र कंपाऊंडमध्येही दीपशिखा व अभिषेक वर्मा यांनी दुसरे स्थान मिळविले. प्रथमेश जावकरला मात्र वैयक्तिकमध्ये 11 वे