महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

यशस्वीचा हजार धावांचा टप्पा

06:22 AM Jul 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/पल्लीकेली

Advertisement

भारतीय संघातील सलामीचा स्फोटक फलंदाज यशस्वी जैस्वालने 2024 च्या  क्रिकेट हंगामात 1 हजार धावांचा टप्पा ओलांडला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये या कालावधीत हा पराक्रम करणारा जैस्वाल पहिला फलंदाज आहे. लंकेविरुद्ध सुरू असलेल्या टी-20 मालिकेतील रविवारी खेळविण्यात आलेल्या दुसऱ्या सामन्यात जैस्वालने 15 चेंडूत 2 षटकार आणि 3 चौकारांच्या मदतीने जलद 30 धावा जमविताना 200.00 स्ट्राईक रेट राखला आहे. जैस्वालने चालु वर्षीच्या क्रिकेट हंगामात केवळ 13 सामन्यात 1 हजार धावांचा टप्पा ओलांडला आहे. त्याने 63.93 धावांच्या सरासरीने 1023 धावा जमविल्या असून त्यामध्ये 2 शतके आणि 5 अर्धशतकांचा समावेश आहे. इंग्लंडविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेमध्ये जैस्वालने 74 धावांच्या सरासरीने 5 सामन्यातील 11 डावांत  2 द्विशतके आणि 3 अर्धशतकांसह 740 धावा झोडपल्या होत्या. या कालावधीत टी-20 च्या 7 सामन्यात 47.16 धावांच्या सरासरीने 283 धावा जमविल्या असून त्यामध्ये 2 अर्धशतकांचा समावेश आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article