महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

उदं गं आई उदं...च्या गजरात निलजी गावची यल्लम्मा यात्रा उत्साहात

10:10 AM Feb 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वार्ताहर /सांबरा

Advertisement

उदं गं आई उदो..च्या जयघोषात व भंडाऱ्याची उधळण करत निलजी गावची यल्लम्मा यात्रा मोठ्या उत्साही वातावरणात पार पडली.  तब्बल पाच वर्षानंतर एकदा या गावातून फरशी जाण्याचा कार्यक्रम होत असतो. नवीन पडलीचे नूतनीकरण, लहान मुलांची नावे ठेवणे आदि धार्मिक कार्यक्रम यावेळी करण्यात आले. आठवडाभर चाललेल्या या कार्यक्रमात गावातील प्रत्येक कुटुंबाचा सहभाग होता. दि. 23 ते 30 जानेवारीपर्यंत चाललेल्या या यात्रा कार्यक्रमाची सांगता ब्रह्मलिंग देवस्थान परिसरात पडली भरण्याच्या कार्यक्रमाने झाली. देवस्थान पंचकमिटी व श्रीराम मंदिर ट्रस्ट निलजी यांच्या परिश्रमाने श्रीक्षेत्र सौंदत्ती येथे बांधण्यात आलेल्या 2 एकर जागेतील वसतिगृह, स्वच्छतागृह व पाण्याची व्यवस्था नीटनेटकी करण्यात आल्याने भाविकांची थोडीफार व्यवस्था झाली. शाकंभरी पौर्णिमेला मंदिर व परिसरात लाखो भक्तगण एकत्र येत असतात व या गर्दीचा फायदा घेत चोरटे आपले इप्सित साध्य करत असतात. पण निलजी गावची स्वतंत्र व्यवस्था केली असल्याने चोरी, वस्तूंची पळवापळवी यासारखे प्रकार येथे घडले नाहीत. यामुळे भाविकांनी यात्रा कमिटीचे आभार मानले.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article