‘एक्स’ ची पुनर्बांधणी करणाऱ्या याकारिनोंचा राजीनामा
एक्सचे दोन वर्षे सीईओ म्हणून पद सांभाळले
वृत्तसंस्था/न्यूयॉर्क
दिग्गज उद्योगपती एलॉन मस्क यांच्या मालकीचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (पूर्वीचे ट्टिटर) च्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) लिंडा याकारिनो या पदमुक्त झाल्या आहेत. त्यांनी एक्सचे सीईओपद हे मागील दोन वर्ष यशस्वीपणे सांभाळले आहे. लिंडा यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे, की एक्स मधील कार्यकाळ सकारात्मक राहिला आहे. भविष्यामध्येही आशादायी चित्र असल्याचेही त्या म्हणाल्या आहेत. एक्स हा डिजिटल प्लॅटफॉर्म असून हा सर्वांना व्यक्त होण्याची संधी देतो व तो आजच्या संस्कृतीचे प्रतीक बनला आहे. राजीनामा दिल्यानंतर एक्सचे प्रमुख मस्क यांनी म्हटले की, ‘तुमच्या योगदानाबद्दल धन्यवाद’ असे म्हणत आभार व्यक्त केले असून त्यांनी अनेक पदे सांभाळली असल्याचेही नमूद केले.
लिंडांनी एक्ससाठी मोठ्या गोष्टी केल्या
समुदाय नोट्स: हे एक वापरकर्ता-आधारित तथ्य-तपासणी वैशिष्ट्या आहे. यामध्ये, लोक पोस्टवरील खोटी किंवा दिशाभूल करणारी माहिती हायलाइट करू शकतात. त्याचा उद्देश चुकीची माहिती कमी करणे आणि प्लॅटफॉर्मला विश्वासार्ह बनवणे हा होता. एक्स मनी (पेमेंट सेवा): लिंडाच्या नेतृत्वाखाली, एक्स मनी नावाचे एक नवीन आर्थिक सेवा वैशिष्ट्या लाँच करण्याची तयारी करत आहे. हे एक पेमेंट प्लॅटफॉर्म आहे जे वापरकर्त्यांना चीनच्या sंाण्प्at प्रमाणे पैसे पाठवू आणि प्राप्त करू देते.
सर्वात प्रभावशाली महिला म्हणून घोषित
61 वर्षीय लिंडा याकारिनो एनबीसी युनिव्हर्सल मीडिया एलएलसी येथे ग्लोबल अॅडव्हर्टायझिंग अँड पार्टनरशिपच्या अध्यक्षा आहेत. 2011 मध्ये एनबीसी युनिव्हर्सल मीडियामध्ये सामील झाल्यानंतर, त्यांनी कंपनीसाठी वन प्लॅटफॉर्म तयार केला. वन प्लॅटफॉर्मने प्रीमियम व्हिडिओ इकोसिस्टम बदलला आहे. हे प्लॅटफॉर्म जाहिरातदारांना सर्व क्रीन आणि फॉरमॅटमध्ये प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यास मदत करते.