महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

याह्या सिनवार हमासचा नवा प्रमुख

06:02 AM Aug 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

खान युनिसचा बुचर अशी ओळख : 8 वर्षांपासून भूमिगत : निम्मे आयुष्य काढले तुरुंगात

Advertisement

वृत्तसंस्था / गाझा

Advertisement

इस्माइल हानियनेहच्या मृत्यूनंतर याह्या सिनवारला हमासचा प्रमुख म्हणून नेमण्यात आले आहे. हमासने यासंबंधी एक वक्तव्य जारी करत माहिती दिली आहे. यापूर्वी याह्या सिनवार केवळ गाझामध्ये हमासची धुरा सांभाळत होता. हानियेह कतारमधून संघटनेला संचालित करत होता. याह्या हा गाझामध्येच वास्तव्यास आहे. 2017 मध्ये त्याला गाझामधील प्रमुख करण्यात आल्यापासुन तो कधीच सर्वांसमोर आलेला नाही. सिनवारची हमासवर अत्यंत मजबूत पकड आहे.

तेहरानमध्ये हानियेहचे वास्तव्य असलेल्या ठिकाणी क्षेपणास्त्राने हल्ला करण्यात आला होता. यात हानियेह आणि त्याचा एक सुरक्षारक्षक मारला गेला होता. हानियेहच्या नेतृत्वातच हमासने मागील वर्षी 7 ऑक्टोबर रोजी इस्रायलवर 75 वर्षांमधील सर्वात मोठा हल्ला केला होता. या हल्ल्यात 1200 हून अधिक जणांचा मृत्यू झाला होता. तर सिनवार या हल्ल्यांचा सूत्रधार होता.

सिनवारचीच निवड का?

सर्वसाधारणपणे एखादा प्रमुख मारला गेल्यावर त्याची जागा उपप्रमुख घेत असतो. परंतु हमासचा उपप्रमुख राहिलेल्या सालेह अल-अरुरीची हत्या जानेवारी महिन्यात झाली होती.  इस्रायलच्या सैन्याने एका ड्रोन हल्ल्यात हमासच्या दुसऱ्या क्रमांकाच्या नेत्याला ठार केले होते. हमासच्या पॉलिटिकल विंगमध्ये सध्या क्रमांक-1 आणि क्रमांक-2 दोन्ही जागा रिक्त होत्या. इस्रायलच्या कारवाईमुळे गाझामध्ये निर्माण झालेली स्थिती सिनवारपेक्षा चांगल्याप्रकारे समजून घेणारा कुठलाच नेता हमासकडे नाही. आता सिनवारच ओलिसांची मुक्तता आणि शस्त्रसंधीशी निगडित महत्त्वाचे निर्णय घेणार आहे.

शरणार्थी शिबिरात जन्म

नव्या हमास प्रमुखाचे पूर्ण नाव याह्dया इब्राहिम हसन सिनवार असून त्याचा जन्म गाझापट्टीचा दक्षिण भाग खान युनिसच्या शरणार्थी शिबिरात झाला होता. याह्याचे आईवडिल हे अश्केलॉन येथील होते. 1948 मध्ये  इस्रायलची स्थापना झाल्यावर हजारो पॅलेस्टिनींना त्यांच्या घरांमधून हाकलण्यात आले, यात याह्याच्या आईवडिलांचाही समावेश होता. दोन इस्रायली सैनिक आणि 4 पॅलेस्टिनींचे अपहरण तसेच त्यांची हत्या करण्याच्या आरोपाखाली सिनवारला 1989 मध्ये अटक करण्यात आली होती. त्यावेळी त्याचे वय 19 वर्षे होते. या गुन्ह्यांप्रकरणी त्याला आजन्म कारावास ठोठावण्यात आला होता. परंतु 2011 मध्ये इस्रायली सैनिक गिलाद शालिटच्या मुक्ततेच्या बदल्यात इस्रायलला 1 हजाराहून अधिक कैद्यांना सोडावे लागले होते आणि यात सिनवार देखील सामील होता. तोपर्यंत सिनवारने सुमारे 22 वर्षे तुरुंगात काढली होती.

निर्घृण हत्या करणारा

सिनवारला निर्घृणपणे हत्या करण्यासाठी ओळखले जाते. सिनवारने इस्रायलसाठी हेरगिरी केल्याच्या संशयामुळे एका व्यक्तीला त्याच्या भावाच्या हातून जिवंत गाडले होते. क्रूर वर्तनामुळेच सिनवारला खान युनिसचा बुचर असेही म्हटले जोत. सिनवारचे निकटवर्तीय देखील त्याला घाबरूनच असतात. सिनवारचे म्हणणे खोडून काढण्याचा अर्थ स्वत:चे जीवन गमाविणे असल्याचे बोलले जाते. सिनवारने 2015 मध्ये हमास कमांडर महमूद इश्तिवीचा अनन्वित छळ करून जीव घेतला होता. इश्तिवीवर समलैंगिकता आणि पैशांची अफरातफर करण्याचा आरोप होता. सिनवार हा लोकांना नियंत्रित करण्यास तरबेज आहे. परंतु तो चांगला वक्ता नसल्याचे मानले जाते. 2015 मध्ये अमेरिकेने याह्dया सिनवारला दहशतवादी घोषित केले होते. सिनवार हा इराणच्या नेतृत्वाचा निकटवर्तीय असल्याचे बोलले जाते.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article