शाओमीचा रेडमी नोट 14 प्रो भारतात लाँच
किंमत 30 हजाराच्या पुढे : 50 एमपीचा कॅमेरा
वृत्तसंस्था/ कोलकाता
चिनी स्मार्टफोन कंपनी शाओमी यांनी आपला रेडमी नोट 14 प्रो व प्रो प्लस हे दोन फोन भारतीय बाजारात लाँच केले आहेत. 30 हजारच्या पुढे यांच्या किमती असणार असल्याची माहिती आहे.
कंपनीने रेडमी नोट 14 प्रो, नोट प्रो प्लस ही दोन मॉडेल्स लाँच केली आहेत. 6.67 इंचाचा अमोलेड डिस्प्ले याला असून इतर ब्रँडस् जसे की वनप्लस, विवो, रिअलमी व मोटोरोला यांच्याशी सदरचा फोन टक्कर देईल. प्रो फोनला 50 मेगापिक्सलचा कॅमेरा 8 एमपी अल्ट्रावाइड लेन्सस असणार असून बॅटरी 6200 एमएएच क्षमतेची असणार आहे. कॉर्निंग गोरिला ग्लास विक्टस 2 चे याला संरक्षण असून पाठिमागे गोरीला ग्लास 7 आयचे संरक्षण दिले आहे.
फास्ट चार्जिंग सुविधा
45 डब्ल्यूचा फास्ट चार्जर याला असेल. 8 जीबी रॅम, 128 जीबी स्टोरेजच्या प्रो प्लसची किंमत 30,999 रुपये असून 8जीबी रॅम, 256 जीबी स्टोरेजचा फोन 32,999 रुपयांना असणार आहे. 12 जीबी, 512 जीबी स्टोरेजचा फोन 35,999 रुपयांना मिळेल. तर प्रोची किंमत 24,999 रुपये (8 जीबी, 128 जीबी), 26,999 रुपये (8जीबी, 256 जीबी) असणार आहे.