सिम-बाइंडिंग नियम होणार लागू
सर्व काम 90 दिवसांमध्ये पूर्ण करण्याचे निर्देश
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दूरसंचार विभागाने (डाओटी) भारतात कार्यरत असलेल्या सर्व ओटीटी कम्युनिकेशन अॅप्सना पुढील 90 दिवसांत डिव्हाइसवर सिम-बाइंडिंगचे काम पूर्ण करण्यास सांगितले आहे.
28 नोव्हेंबर रोजी व्हाट्सअॅप, टेलिग्राम, सिग्नल, आर्टाई, स्नॅपचॅट, शेअरचॅट, जिओचॅट आणि जोश सारख्या मेसेजिंग आणि कम्युनिकेशन अॅप्सना पाठवलेल्या पत्रात, दूरसंचार विभागाच्या एआय आणि डिजिटल इंटेलिजेंस युनिटने स्पष्ट केलंय या प्लॅटफॉर्मना हे सुनिश्चित करावे लागेल की अॅप नेहमी त्याच सिम कार्ड व त्याच मोबाइल नंबरशी जोडलेले आहे ज्यावर खाते प्रथम नोंदणीकृत होते. सिम कार्ड बाइंडिंगचा उद्देश दूरसंचार ओळख, उपकरणे, नेटवर्क आणि सेवांचा गैरवापर रोखणे, सायबर सुरक्षा मजबूत करणे आहे. जर नोंदणीकृत मूळ सिम कार्ड डिव्हाइसवर उपस्थित नसल्यास अशा कम्युनिकेशन अॅप्सना मोबाइलवर चालण्याची परवानगी नाही. ज्या कम्युनिकेशन अॅप्समध्ये अनेक डिव्हाइसेसवर एक खाते चालवण्याची सुविधा आहे त्यांनी कंपॅनियन डिव्हाइसवरील खाते दर सहा तासांनी आपोआप लॉग आउट झाले आहे याची खात्री करावी.
याचा काय परिणाम होईल?
व्हॉट्सअॅप, टेलिग्राम, सिग्नल सारख्या ध्ऊऊ कम्युनिकेशन अॅप्सच्या सक्रिय वापरकर्त्यांची संख्या प्रचंड कमी होऊ शकते. तिसऱ्या अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, लॅपटॉप किंवा आयपॅड सारख्या कंपॅनियन डिव्हाइसवरून दर सहा तासांनी लॉग आउट करण्याची आवश्यकता अनेक ऑपरेशनल समस्या निर्माण करेल कारण अनेक कंपन्या ऑफिसच्या मजल्यावर फोन किंवा मोबाइल डिव्हाइस घेऊन जाऊ देत नाहीत.