स्मार्टफोन बाजारामध्ये ‘शाओमी’ आघाडीवर
सॅमसंगची पिछेहाट : कॅनॅलिसच्या अहवालात माहिती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय स्मार्टफोन बाजारामध्ये शाओमीने अग्रस्थान पटकावले आहे. एप्रिल ते जून या तिमाहीत शाओमीने दक्षिण कोरियातील कंपनी सॅमसंगला मागे टाकण्यामध्ये यश मिळवले आहे. याच दरम्यान स्मार्टफोन विक्रीच्या बाजारामध्ये दुसऱ्या नंबरवर विवो ही कंपनी राहिली आहे तर सॅमसंग आता तिसऱ्या क्रमांकावर फेकली गेली आहे. कॅनॅलिस यांच्या अहवालामध्ये ही माहिती देण्यात आली आहे.
दुसऱ्या तिमाहीत निवडणूक, मागणीत राहिलेली मंदी व खराब हवामानाच्या कारणास्तव स्मार्टफोनच्या शिपमेंटमध्ये घसरण दिसून आली. या तिमाहीत काही कंपन्यांनी उच्च श्रेणीतील स्मार्टफोन्स नव्याने बाजारात सादर केले.
बाजारात वाटा वाढला
शाओमीने वर्षाच्या आधारावर पाहता 24 टक्के स्मार्टफोनच् ााr शिपमेंट केली आहे. या योगे शाओमीने बाजारात 18 टक्के इतका वाटा जून तिमाहीत उचलला आहे. वर्षाच्या मागे शाओमीचा बाजारातील वाटा 15 टक्के इतका होता. दुसऱ्या नंबरवर असणाऱ्या विवो या कंपनीचा बाजारातील वाटा 4 टक्के इतका वाढला आहे. चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर रियलमी आणि ओप्पो या कंपन्या अनुक्रमे राहिल्या आहेत.
फोन्सवर सवलत
मान्सून हंगाम संपल्यानंतर देशामध्ये विविध उत्सव सण साजरे केले जाणार असून यापूर्वीच आता कंपन्या सवलतीसह स्मार्टफोनची विक्री करून आपल्याकडील शिल्लक साठा कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.