पोको सी 85 भारतीय बाजारात दाखल
6000 एमएएचची बॅटरी : 6.9इंच 120एचझेड डिस्प्ले
नवी दिल्ली :
शाओमीचा सह ब्रँड असणारा पोको यांनी भारतीय बाजारात नवीन बजेटमधील सी 85 हा 5 जी मधील स्मार्टफोन सादर केला आहे. सी आवृत्तीमध्ये स्मार्टफोनमध्ये 6.9 इंच एचझेड डिस्प्ले आणि 6000 एमएएच क्षमतेची बॅटरी मिळणार आहे. यावेळी कंपनीचा दावा आहे की संगीत प्लेबॅक 106 तासांपर्यंत चालेल. हा फोन तीन रंग पर्यायांमध्ये लाँच करण्यात आला आहे: मिस्टिक पर्पल, स्प्रिंग ग्रीन आणि पॉवर ब्लॅक. पोको सी 85 5 जी ची विक्री 16 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता फ्लिपकार्टवर सुरू होईल.
सी85 5जी: डिस्प्ले आणि डिझाइन
पोको सी85 5जी मध्ये 6.9 इंचाचा मोठा एचडी क्रीन आहे, जो 720स1600 पिक्सेल रिझोल्यूशन आणि 120 हर्ट्झ रिफ्रेश रेटसह येतो. पीक ब्राइटनेस 810 निट्स पर्यंत जातो. फोन 7.9 मिमी पातळ आहे आणि त्याचे वजन 211 ग्रॅम आहे. मागील बाजूस क्वाड-कर्व्ह डिझाइन आहे. त्याच वेळी, फोनचे आयपी64 रेटिंग धूळ आणि पावसाच्या शिडकाव्यांपासून त्याचे संरक्षण करते. फोनच्या बाजूला फिंगरप्रिंट स्कॅनर आहे.
सी 85 5 जी : प्रोसेसर आणि स्टोरेज
सी 85 5 जी मध्ये मीडिया टेक 6300 चिपसेट आहे, हा प्रोसेसर शक्तिशाली आणि बॅटरी बचत करणारा आहे. स्कोअर 4.5 लाखांपेक्षा जास्त आहे.
कनेक्टिव्हिटी आणि इतर वैशिष्ट्यो
स्मार्टफोनच्या कनेक्टिव्हिटीमध्ये 5जी, वाय-फाय 5, ब्लूटूथ 5.4, 3.5 मिमी जॅक, यूएसबी टाइप-सी पोर्ट समाविष्ट आहे. याशिवाय, फोनमध्ये अँबियंट लाईट, प्रॉक्सिमिटी, ई-कंपास, एक्सेलेरोमीटर सेन्सर आहेत.