महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

झेवियर्स, कनक, सर्वोदय, अंगडी विजयी

10:27 AM Sep 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

56 वी फादर एडी फुटबॉल स्पर्धा

Advertisement

बेळगाव : पोलाईट्स ऑफ बेळगाव वर्ल्डवाईडतर्फे सेंट पॉल्स हायस्कूलच्या सहकार्याने 56 व्या फादर एडी स्मृतीचषक आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेत बुधवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यांतून सेंट झेवियर्स, सर्वोदय खानापूर, कनक मेमोरीयल संघांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करुन पुढील फेरीत प्रवेश केला आहे. पहिल्या सामन्यात सेंट झेवियर्स संघाने मुक्तांगण संघाचा 8-0 असा पराभव केला. या सामन्यात झेवियर्सतर्फे 13 व 44 व्या मिनिटाला तेजस राजने 2 गोल, 20 व्या मिनिटाला रुझान, 32 व्या मिनिटाला  अर्सलोन, 37 मिनिटाला  मोहीत बी., 47 व्या मिनिटाला  ओम पुजारी, 58 व्या मिनिटाला  रोशन अब्बास तर 60 व्या मिनिटाला अर्जुनने गोल करुन संघाला 8-0 अशा फरकाने विजय मिळवून दिला.

Advertisement

दुसऱ्या सामन्यात कनक मेमोरीयल संघाने केएलएस संघाला सडनडेथमध्ये 4-3 असा पराभव केला. निर्धारीत वेळेत दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आले. त्यामुळे पंच अमिन पिरजादे यांनी टायब्रेकर नियमाचा वापर केला. त्यामध्ये दोन्ही संघांनी 3-3 अशी बरोबरी साधली. कनकतर्फे पवन, अभिषेक व विष्णू यांनी गोल केले. तर केएलएसतर्फे निल बसरीकट्टी, प्रणव लाड, समर्थ अरगंजी यांनी गोल केले. सडनडेथमध्ये कनकतर्फे प्रफुल्लने गोल केला. तर केएलएसतर्फे अथर्व जाधवने गोल केला. तर कनकतर्फे मंथन व वेदांत यांनी गोल केले. तिसऱ्या सामन्यात सर्वोदय संघाने कॅन्टोन्मेंट बोर्ड संघाचा 3-1 असा पराभव केला. सर्वोदयतर्फे 7 व्या मिनिटाला नाविद कित्तूरने, 39 व्या मिनिटाला रुजाई कोलासके तर 59 व्या मिनिटाला आनंद राऊत यांनी गोल केले. कॅन्टोन्मेंट बोर्डतर्फे आफताब शेखने एकमेव गोल केला. चौथ्या सामन्यात अंगडी संघाने एमव्हीएम संघाचा 2-1 असा पराभव केला.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article