कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

एक्स एआय ने चॅटबॉट ‘ग्रोक 3’ केले लाँच

06:11 AM Feb 19, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

जगातील सर्वात स्मार्ट एआय असल्याचा दावा : ओपनएआय-डीपसीक सारख्या एआय मॉडेल्सशी स्पर्धा

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

टेस्लाचे संस्थापक एलॉन मस्क आणि एक्सएआय यांनी 18 फेब्रुवारी रोजी  चॅटबॉट ‘ग्रोक 3’चे सादरीकरण केले आहे. या सादरीकरणा दरम्यान टेस्ला आणि एक्सचे मालक मस्क यांनी ग्रोक 3 ला जगातील सर्वात स्मार्ट एआय असल्याचा दावा केला आहे.

‘ग्रोक 3’ च्या सादरीकरणाच्या दरम्यान, मस्क कृत्रिम बुद्धिमत्ता कंपनी एक्सएआयच्या टीम सदस्यांसोबत बसले होते. मस्क यांनी ग्रोक 3 च्या क्षमता देखील प्रदर्शित केल्या. त्यांनी ग्रोक 3 ओपनएआय, गुगल, डीपसीक सारख्या इतर एआय मॉडेल्सशी स्पर्धा कशी करू शकते आणि त्यांना कसे हरवू शकते हे देखील स्पष्ट केले.

मस्क म्हणाले, ‘ग्रोक 3 सादर करण्यास आम्हाला खूप आनंद होत आहे. आम्हाला विश्वास आहे की आम्ही ते खूप कमी वेळात ग्रोक 2 पेक्षा कितीतरी पटीने अधिक सक्षम बनवले आहे.’ ग्रोक 3 इतर एआय मॉडेल्सपेक्षा खूप पुढे आहे. लाँच दरम्यान, मस्क आणि एक्सएआय टीमने ग्रोक 3 ओपनएआय, गुगल, डीपसीक सारख्या इतर एआय मॉडेल्सपेक्षा कसे पुढे आहे हे सांगितले. त्यांनी ग्रोक 3 गणित, विज्ञान आणि कोडिंग बेंचमार्कमध्ये जेमिनी 2 प्रो, क्लाउड 3.5 सॉनेट, जीपीटी 4ओ आणि डीपसीक व्ही3 सारख्या इतर सर्व मॉडेल्सपेक्षा कसे पुढे आहे हे स्पष्ट केले.

ग्रोक 3 कसे वापरावे?

ग्रोक 3 सुरू करण्यात आले आहे. ते एक्सच्या प्रीमियम प्लॅन वापरणाऱ्या ग्राहकांसाठी उपलब्ध असेल. या प्लॅनची किंमत 1,525 प्रति महिनापासून सुरू होते. मस्कने त्यांच्या चाहत्यांसाठी सुपर ग्रोक नावाचे वेगळे सबक्रिप्शन देखील जाहीर केले आहे. हे सबक्रिप्शन घेणाऱ्या वापरकर्त्यांना ग्रोक 3 चे सर्व नवीन अपडेट्स आणि वैशिष्ट्यो सर्वात आधी मिळणार आहेत.

ग्रोक हे नाव का देण्यात आले?

ग्रोक हा शब्द रॉबर्ट हेनलेन यांच्या ‘स्ट्रेंजर इन अ स्ट्रेंज लँड’ या कादंबरीतून आला आहे. कादंबरीत हा शब्द मंगळावर वाढलेल्या पात्रासाठी वापरला आहे. या शब्दाचा अर्थ काहीतरी पूर्णपणे आणि खोलवर समजून घेणे असा होतो. म्हणूनच, एक्सएआय आणि एलॉन मस्क यांनी त्यांच्या एआय मॉडेलचे नाव ग्रोक ठेवले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article