कणकवली,देवगड व वैभववाडीत पोलिस पाटील पदांसाठी लेखी परीक्षा रविवारी
मालवण । प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोलिस पाटील नियुक्तीची प्रक्रिया महाराष्ट्र शासनाच्या वतीने सुरू करण्यात आली आहे.या पैकी कणकवली उपविभागीय दंडाधिकारी कार्यक्षेत्रात येणाऱ्या कणकवली,देवगड व वैभववाडी या तीन तालुक्यात मिळून एकंदरीत १३४ पोलिस पाटील पदांच्या भरती साठीची लेखी परिक्षा येत्या रविवारी होणार आहे.या पदासाठी सुमारे पाचशेहून अधिक युवक युवतींनी अर्ज दाखल केल्याचे समजते. या सर्व उमेदवारांकडून या परिक्षेची पुर्वतयारी करून घेण्यासाठी आरक्षित महासंघातर्फे एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन मोफत आयोजन करण्यात आले आहे. सदर पोलिस पाटील पद भरतीसाठीच्या लेखी परिक्षेचे स्वरूप व प्रश्नपत्रिका सोडवितांना घ्यावयाची काळजी,अपेक्षित प्रश्न या विषयीचे मार्गदर्शन करण्यासाठी निवृत्त ग.वि.अ.श्री.विजय चव्हाण,निवृत्त अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री.अरविंद वळंजू आणि पो.पा.संघटनेचे अनुभवी पदाधिकारी उपस्थित रहाणार आहे. या कार्यशाळेला मार्गदर्शन करण्यासाठी मा.जिल्हाधिकारी श्री.किशोर तावडे यांनाही महासंघा तर्फे निमंत्रित करण्यात आले आहे.
कणकवली रेल्वे स्थानका नजिकच्या वाळकेश्वर मंगल कार्यालय,मुडेडोंगरी येथे शुक्रवार दि.१५डिसेंबर रोजी सकाळी १०.३०ते सायं.४.३० या वेळात आयोजित ही पो.पा.परिक्षा पुर्वतयारी कार्यशाळा सर्व परिक्षार्थींसाठी खुली व मोफत आहे.तरी या कार्यशाळेचा लाभ कणकवली-देवगड-वैभववाडी तालुक्यातील सर्व परिक्षार्थींनी घ्यावा असे आवाहन ओ.बि.सी. आरक्षित समाज महासंघाचे जिल्हाध्यक्ष नितीन वाळके यांनी केले आहे.अधिक माहिती साठी महासंघाचे कार्याध्यक्ष मा.चंद्रशेखर उपरकर यांचेशी संपर्क करावा.