For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात आरोग्य सेवा सक्षम नसल्यामुळे गैरसोय

05:44 PM Nov 28, 2024 IST | अनुजा कुडतरकर
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात आरोग्य सेवा सक्षम नसल्यामुळे गैरसोय
Advertisement

न्हावेली उपसरपंच अक्षय पार्सेकर यांचा आरोप ; प्रश्न न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

Advertisement

न्हावेली / वार्ताहर
सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयात आरोग्य सेवा सक्षम नसल्यामुळे अपघात प्रसंगी अनेक जखमी अनेक युवकांना जीव गमवावा लागत आहेत. या रुग्णालयात आरोग्य सेवा उपलब्ध नसल्यामुळेच न्हावेली पार्सेकरवाडी येथील भूषण उदय पार्सेकर या युवकाचा मृत्यू झाला असा आरोप न्हावेली उपसरपंच अक्षय पार्सेकर यांनी केला आहे तर यापुढे गावासह तालुक्यातील युवकांच्या साथीने आरोग्याचा प्रश्न सुटण्यासाठी आंदोलन करू असाही इशारा त्यांनी दिला आहे. याबाबत त्यांनी प्रसिद्धी पत्रक दिले आहे त्यात असे म्हटले आहे की,सावंतवाडीत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल होणार असा वारंवार घोषणा केली जात आहे मात्र या ठिकाणी असलेले उपजिल्हा रुग्णालय ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्यातच आरोग्याच्या सुविधा सक्षम नसल्यामुळे अनेक रुग्णांना जीव गमवावा लागत आहे याचा परिणाम अनेक कुटुंबावर होत आहे नुकताच न्हावेली पार्सेकरवाडी येथील भूषण पार्सेकर युवकाचे अपघातात निधन झाले या प्रकारचे आपल्या सिंधुदुर्गातील अनेक तरुण योग्य वेळी योग्य उपचार सोयी नसल्याने मृत्यूच्या दारात ओडले जातात त्यांना गोवा बांबोळी ठिकाणी न्यावे लागते तो पर्यंत खूप विलंब होतो याला सुद्धा कारणीभूत येथील कमकुवत आरोग्य सेवाच आहेत त्याच्यावर उपचार करण्यासाठी विलंब झाल्यामुळेच त्याचा मृत्यू झाला त्यामुळे यापुढे तरी लोकप्रतिनिधींनी आरोग्याच्या प्रश्नावर काम करणे गरजेचे आहे अन्यथा या ठिकाणी आंदोलन करण्यात येईल आणि याला जबाबदार प्रशासन राहिल असाही इशारा त्यांनी यावेळी दिला आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.