आनंदवाडीत उद्या जंगी कुस्त्यांचे आयोजन
देवा थापाची मनोरंजन कुस्तीकडे शौकिनांचे लक्ष
बेळगाव : बेळगाव जिल्हा कुस्तीगीर संघटना आयोजित आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदानाचे आयोजन बुधवार दि. 12 मार्च रोजी आनंदवाडी आखाड्यात भरविण्यात आले आहे. या मैदानात देवा थापाची मनोरंजन कुस्तीकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. या आखाड्यात प्रमुख कुस्ती बेळगाव केसरी किताबासाठी महाराष्ट्र उगवता मल्ल महाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड वि. आंतरराष्ट्रीय खेळाडू सोहेल इराण यांच्यात, बेळगाव मल्ल सम्राट किताबासाठी महाराष्ट्रात धुमाकुळ घालणारा रुस्तुमेहिंद व महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख व हरियाणा केसरी विशाल हरियाणा यांच्यात, बेळगाव रणवीर किताबासाठी शिवा महाराष्ट्र काका पवारांचा पट्टा वि. आंतरराष्ट्रीय पदक विजेता फ्रॅन्डीला-अमेरिका,
बेळगाव शौर्य किताबासाठी दादा (वेताळ) शेळके-महाराष्ट्र वि. इराणचा हादी यांच्यात होणार आहे. आकर्षक कुस्ती म्हणून डबल कर्नाटक केसरी कार्तिक काटे वि आंतरराष्ट्रीय पदक विजेता मिलाद इराण यांच्यात होणार आहे. सहाव्या क्रमांकाची कुस्ती कर्नाटक केसरी प्रकाश इंगळगी वि. गंगावेस कोल्हापूरचा विजय बिचकुले, सातव्या क्रमांकाची कुस्ती शिवा दड्डी-भांदुर गल्ली वि. सत्पाल नागा टिळक-गंगावेस, आठव्या क्रमांकाची प्रेम जाधव-कंग्राळी व संकेत पाटील-गंगावेस, नवव्या क्रमांकाची कुस्ती कामेश कंग्राळी वि. संजय इंगळगी, दहाव्या क्रमांकाची कुस्ती पार्थ पाटील-कंग्राळी वि. शुभमनगर-पुणे यांच्यात होणार आहे. या शिवाय मनोरंजनाची कुस्ती म्हणून कुस्तीचा जादुगार देवा थापा यांची खास कुस्ती होणार आहे. या शिवाय 90 हून अधिक लहान, मोठ्या कुस्त्यांचे आयोजन केले आहे.