कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

किणयेत आज कुस्ती आखाडा

10:45 AM May 07, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वार्ताहर/किणये 

Advertisement

बाल हनुमान कुस्तीगीर संघटना किणये, यांच्या वतीने खास श्री चौराशीदेवी यात्रेनिमित्त बुधवार दिनांक सात रोजी दुपारी तीन वाजता जांबोटी रोड किणये येथे कुस्ती आखाड्याचे आयोजन करण्यात आले आहे. या आखाड्यामध्ये पहिल्या क्रमांकाची कुस्ती महाराष्ट्र चॅम्पियन उदय खाडेकर विरुद्ध कर्नाटक केसरी, मठपती आखाडा शिवया पुजारी यांच्यात होणार आहे. दुस्रया क्रमांकाची कुस्ती नॅशनल चॅम्पियन कंग्राळी तालीम येथील कामेश पाटील विरुद्ध मामासाहेब मोहोळ तालीम पुणे येथील बाला साळुंखे यांच्यात होणार आहे.

Advertisement

तिस्रया क्रमांकाची कुस्ती पुणे येथील नितीन साळुंखे विरुद्ध नॅशनल चॅम्पियन प्रेम जाधव यांच्यात होणार आहे. चौथ्या क्रमांकाची महेश तीर्थकुंडे विरुद्ध सिद्धाप्पा हंचनाळ सोलापूर, पाचवा क्रमांक प्रथमेश हटकर व ओमकार राशिवडे, सहावा क्रमांक पंकज चापगाव विरुद्ध सुपियम सय्यद, सातव्या क्रमांक विनायक वेल्डर विरोध पृथ्वीराज कंग्राळी आठव्या क्रमांकाची कुस्ती श्रीकांत शिंदे विरुद्ध राहुल डुकरे किनये, नवनाथ क्रमांक तुकाराम किन्ही विरुद्ध केशव सांबरा, दहावा क्रमांक विकास चापगाव विरुद्ध सुमित कडोली यांच्यात होणार आहे. याचबरोबर अशा 28 कुस्त्या या खड्यात होणार आहेत तसेच

मानाच्या मेंढ्याची कुस्ती समर्थ पाटील विरुद्ध स्वयम उचगाव यांच्यात होईल तसेच मानाच्या गद्याची कुस्ती वैष्णव गुरुव किणये विरुद्ध शिवानंद येळ्ळूर यांच्यात होणार आहे. त्याचबरोबर या आखाड्यात काही निवडक महिला कुस्त्या होणार आहेत. आखाड्याचे उद्घाटन युवा नेते मृणाल हेब्बाळकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तर  आखाड्याचे पूजन ज्ञानेश्वर सोसायटीचे चेअरमन सुरेश डुकरे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article