विविध संघटनांतर्फे कुस्तीपटू स्वाती पाटीलचा सत्कार
12:15 PM Oct 01, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
बेळगाव : म्हैसूर दसरा महोत्सवात राज्यस्तरावर महिला कुस्तीमध्ये प्रथम क्रमांक मिळवून ‘दसरा किशोरी’ पुरस्कार पटकावलेल्या येथील डी. वाय. स्पोर्ट्स हॉस्टेलची विद्यार्थिनी स्वाती पाटील हिचा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मंगळवार दि. 30 रोजी पालकमंत्र्यांच्या कुवेंपूनगरातील निवासस्थानी हा कार्यक्रम झाला. राज्यस्तरीय कुस्तीमध्ये द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थिनींनाही पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरविण्यात आले. महिला कुस्तीपटूंना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने म्हैसूर दसरा महोत्सवात कुस्तीचे आयोजन करण्यात येत असते, असे पालकमंत्री यावेळी म्हणाले. आमदार आसिफ सेठ, पालकमंत्र्यांचे स्वीय सचिव मलगौंडा पाटील, डी. वाय. स्पोर्ट्स हॉस्टेलच्या प्रशिक्षक स्मिता पाटील, मंजुनाथ मादर आदी उपस्थित होते.
Advertisement
Advertisement