For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सोन्याच्या वजनात होतेय...‘गोलमाल’! ‘इरीडीयम’ पावडरमुळे शुध्दता तीच, वजन मात्र वाढते, सुवर्ण कारागिरांना फटका

01:20 PM Feb 06, 2024 IST | Abhijeet Khandekar
सोन्याच्या वजनात होतेय   ‘गोलमाल’  ‘इरीडीयम’ पावडरमुळे शुध्दता तीच  वजन मात्र वाढते  सुवर्ण कारागिरांना फटका
gold Iridium powder
Advertisement

विद्याधर पिंपळे कोल्हापूर

सोने हा सर्वात महागडा व मूल्यवान धातू. गुंजभर सोने घेणे सुध्दा आता सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. आता सोन्याच्या वजनामध्ये ‘गोलमाल’चा प्रकार वाढू लागला आहे. सोन्यामध्ये ‘इरीडीयम’ धातूच्या पावडरचा वापर केला जात आहे. सोन्याची शुध्दता तशीच ठेवून, वजन मात्र वाढवून ग्राहकांच्या खिशावर डल्ला मारण्याचा प्रकार वाढू लागला आहे. यासंदर्भातील तक्रारी देशभरात सुरू असून, कोल्हापुरातही कोल्हापूर सराफ व्यापारी संघाकडे अशा तक्रारी आल्या आहेत. या गोलमालीचा फटका सुवर्ण कारागिरांना बसत असल्याने चौकशीची मागणी होत आहे.

Advertisement

देशभरात 5 ते 6 वर्षापूर्वी या पावडरचा वापर करून, ग्राहकांच्या खिशाला कात्री मारण्याचा प्रकार सराफ बाजारामध्ये सुरू होता. पण कांही काळाने हा प्रकार थांबला. सध्या सोन्याचा वाढलेला दर व विवाहांचे वाढलेले मुहूर्त यामुळे सोन्याच्या मागणीत वाढ झाली आहे. त्यामुळे सोन्यातील या गोलमालीच्या प्रकाराने पुन्हा एकदा उचल घेतली आहे. ज्यावेळी सोने वितळले जाते त्यावेळी ही पावडर हवेत विरून, सोन्याचे वजन घटले असल्याचे प्रकार पुढे येऊ लागले आहेत. त्याचा फटका स्थानिक सुवर्णकार कारागिरांना बसला असल्याने, त्यांनी याबाबत सराफ असोसिएशनकडे तक्रार केली आहे. तसेच अशा लोकांची नावे जाहीर करावीत अशी मागणीही होत आहे.

इरीडीयम म्हणजे काय ?
इरीडीयम ही पांढरी पावडर आहे. याचा दर सोन्यापेक्षा कमी असून ही पावडर सोन्यामध्ये मिसळल्यास सोने चांदीपेक्षा कठीण होते. हा धातू 2450 अंश सेल्सियसला वितळत असून, याची घनता 22.4 इतकी आहे. ही पावडर सोन्यात मिसळल्याने सोन्याची शुध्दता तशीच राहून दागिन्याचे वजन मात्र वाढते. आटणीमध्ये सोने वितळल्यास ही पावडर हवेत विरून गेल्याने, त्याचे अस्तित्व नाहीसे होते. आटणीनंतर सोन्याचे वजन कमी होऊन, सुवर्ण कारागिरांना वजनाचा व मजुरीचा फटका बसू लागला आहे. उदाहरणार्थ 10 ग्रॅममध्ये 0.5 वा एक ग्रँम पावडरचा वापर झाल्यास दागिना वजनदार होतो. बऱ्याच वेळा टेस्टींग मशिनमध्ये पावडरचा अंश दिसून येत नाही. हॉलमार्क दागिन्यामध्येसुध्दा ही पावडर असल्याचा संशय आहे.

Advertisement

देशात आठ अधिकृत रिफायनरी
होलसेल सोने खरेदी करणारे बुलियनकडून सोन्याची विक्री होत असते. देशातील अधिकृत शासकीय रिफायनरीमधूनच चोख सोने खरेदी करणे महत्वाचे आहे. कांही खासगी बुलियनही सोन्याची विक्री करत आहेत. यापुर्वी यामध्ये कोल्हापूरचे वर्चस्व होते. आता विटा व तासगांव येथे बुलियन आहेत. पंजाब व हरियाना येथे अनधिकृत बुलियन असून, त्यांच्यामार्फतच इरीडीयम सोन्याची व दागिन्यांची विक्री होत असल्याचे सांगण्यात येत आहे.

सोन्याची आटणी आमने-सामने व्हावी
पावडरमुळे सोन्याचे वजन कमी होऊन, व्यापारी, कारागिरांना फटका बसू लागला आहे. सोन्याच्या आटणीला वेळ लागत नसल्याने, कारागीर, व्यापारी व ग्राहकांनी सोने वितळण्यावेळी समोर असावे व सतर्क रहावे.
नचिकेत भुर्के, पश्चिम संयोजक, ऑल इंडिया ज्वेलर अॅंड गोल्ड स्मिथ फेडरेशन

Advertisement
Tags :

.