For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

स्पेनमध्ये 3 दशकातील सर्वात भीषण पूर

07:00 AM Nov 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
स्पेनमध्ये 3 दशकातील सर्वात भीषण पूर
Advertisement

95 जणांचा मृत्यू : रस्त्यांवर वाहून जाताना दिसल्या कार्स

Advertisement

वृत्तसंस्था/बार्सिलोना

स्पेनच्या वॅलेंसियामध्ये 8 तासांच्या कालावधीत वार्षिक सरासरीइतका पाऊस पडला आहे. या अतिवृष्टीमुळे तेथे पूर आला असून यात 95 जणांचा मृत्यू झाला आहे. पुरामुळे रस्त्यांना नद्याचे स्वरुप प्राप्त झाले आणि कार्स वाहून जाताना दिसल्या आहेत. रेल्वमार्ग व महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. स्पेनमध्ये ही तीन दशकांमधील सर्वात भीषण नैसर्गिक आपत्ती ठरली आहे. अतिवृष्टीसोबत आलेल्या वादळामुळे मलागापासून वॅलेंसियापर्यंत दक्षिण व पूर्व स्पेनच्या मोठ्या हिस्स्यात पूरसंकट निर्माण झाले आहे. वादळ उत्तर-पूर्वच्या दिशेला सरकल्याने कॅटेलोनियाच्या हिस्स्यात रेड अलर्ट जारी केला आहे. घरांमध्ये अडकून पडलेल्या लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी हेलिकॉप्टर्सची मदत घेण्यात आली आहे. काही लोक जीव वाचविण्यासाठी स्वत:च्या कारवर चढून बसले होते.

Advertisement

Worst floods in Spain in 3 decadesवॅलेंसिया शहराच्या युटीएलचे महापौर रिकार्डो गॅबल्डन यांनी हा जीवनातील सर्वात वाईट दिवस होता, असे उद्गार काढत वाहने आणि कचऱ्याची पेटी रस्त्यांवरून वाहत होती, पाणी तीन मीटरपर्यंत वाढले होते व अनेक लोक अद्याप बेपत्ता असल्याचे म्हटले आहे. मलागानजीक 300 लोक प्रवास करत असलेली एक हायस्पीड रेल्वे रुळावरून घसरली आहे. परंतु सुदैवाने या दुर्घटनेत कुणालाच ईजा झालेली नाही. वॅलेसिंया आणि माद्रिद दरम्यान हायस्पीड रेल्वेसेवा यामुळे प्रभावित झाली आहे. माद्रिद आणि बार्सिलोना शहरांच्या दिशेने धावणाऱ्या रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत. पूरसंकटात झालेल्या जीवितहानीनंतर स्पेनच्या सरकारने तीन दिवसांच्या शोकाची घोषणा केली आहे. स्पेनच्या विविध हिस्स्यांमध्ये सुमारे 1200 लोक अद्याप अडकून पडले आहेत. तर पाण्याच्या वाढत्या प्रमाणामुळे हजारो वाहने रस्त्यांवर उभी आहेत. उटीएल अणि पॅपोर्टा यासारख्या नद्यांच्या काठांवर असलेले रस्ते पाण्याखाली गेले आहेत.

Advertisement
Tags :

.